प्रचाराचा नारळ फुटला ! मुख्यमंत्री-उद्धव ठाकरेंकडून विरोधकांचा खरपूस समाचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2019
Total Views |

कोल्हापुरात महायुतीच्या भव्य सभेला लोटला जनसागर



कोल्हापूर
: देश चालवण्यासाठी ५६ पक्ष नाही, ५६ इंचाची छाती असावी लागते. नावात राष्ट्रवादी शब्द घालून राष्ट्रवादी होता येत नाही, राष्ट्रवाद हा मनात असावा लागतो. आज भारतीय सैन्यदलांच्या पराक्रमावर केवळ दोनच लोक पुरावे मागत आहेत. एक पाकिस्तान आणि दुसरी म्हणजे काँग्रेस, अशा कठोर शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांचा समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूर येथे विराट सभेमध्ये करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी सभेपूर्वी अंबाबाईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळी झालेल्या महायुतीच्या सभेला कोल्हापूरवासियांचा तुफान प्रतिसाद लाभला. या सभेस मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे पदुम मंत्री महादेव जानकर, युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे अनेक प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस आज सभेला उपस्थित जनतेचा महासागर हा महायुतीच्या विजयाची साक्ष देणारा जनसागर आहे. कोल्हापूरमध्ये समतेचा नारा दिला गेला, म्हणून कोल्हापूरची निवड प्रचाराच्या शुभारंभासाठी केल्याचे त्यांनी सांगितले. देश चालवण्यासाठी ५६ पक्ष नाही, ५६ इंचाची छाती असावी लागते. नावात राष्ट्रवादी शब्द घालून राष्ट्रवादी होता येत नाही, राष्ट्रवाद हा मनात असावा लागतो. राष्ट्रवादी काँग्रेस ही भ्रष्टाचार व्यवस्थापन कंपनी आहे, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा समाचार घेतला. आज भारतीय सैन्यदलांच्या पराक्रमावर केवळ दोनच लोक पुरावे मागत आहेत. एक पाकिस्तान आणि दुसरी म्हणजे काँग्रेस, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

 

देव, देश, धर्मासाठी युती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, महायुतीला विरोध करायला ५६ पक्ष एकत्र आले आहेत पण अजूनही त्यांच्यात भांडणे चालू आहेत. नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरले आहेत पण विरोधकांचे कोण आहेत हा प्रश्न आहे. मोदींचे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहे. शेतकऱ्यांचे व मुंबईचे प्रश्न आपण मांडले तर मुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय घेऊन कारवाई केली. आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिमान वाटतो. त्यांनी शब्द दिला व पाळला, अशा शब्दांत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा केली. आम्ही देव, देश आणि धर्मासाठी युती केली आहे. गरिबांचे भले करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी असल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. माथाडी कामगारांचे नेते तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. रामदास आठवले, चंद्रकांतदादा पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@