शिमल्यात एसएफआय कार्यकर्त्यांचा संघशाखेवर भ्याड हल्ला, , १५ स्वयंसेवक जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2019
Total Views |



शिमला : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआय या कम्युनिस्ट विचारधारेच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिमाचल प्रदेशातील शिमला येथील हिमाचल प्रदेश विश्वविद्यालय येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर हल्ला केला. यामध्ये १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत.

 

रविवारी सकाळी हिमाचल प्रदेश विश्वविद्यालयाच्या वसतिगृहाच्या परिसरात संघशाखेवर उपस्थित स्वयंसेवकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात शाखेवर उपस्थित १५ स्वयंसेवक जखमी झाले आहेत. संबंधित शाखा स्वयंसेवकांकडून व स्थानिक प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी संघशाखेवर हल्ला केल्यानंतर एवढ्यावरच न थांबता वसतिगृहातही हैदोस घातला आणि तेथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनाही मारहाण केली. या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या स्वयंसेवक व अभाविप कार्यकर्त्यांना जवळच्या आयजीएमसी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

 

रा. स्व. संघाची शाखा लावण्यावरून झालेल्या वादानंतर एसएफआयच्या गुंडांची थेट शाखेवर अशाप्रकारे भ्याड हल्ला करण्यापर्यंतमजल गेली असून हिमाचल प्रदेश विश्वविद्यालयात एसएफआय व अन्य डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी असा हिंसक हैदोस घालण्याची ही पहिलीच घटना नाही, अशी माहिती येथील अभाविपच्या कार्यकर्त्याने दिली. एसएफआयच्या या कृत्याचा हिमाचल प्रदेशमधील शैक्षणिक व सामाजिक-सांस्कृतिक वर्तुळातून मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवण्यात येत आहे.


रा. स्व. संघाच्या नियमित शाखेवर असा हिंसक हल्ला होणे ही घटना दुर्भाग्यपूर्ण व निषेधार्ह आहे. पोलीस प्रशासनाला दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून असा हिंसाचार आम्ही कदापि खपवून घेणार नाही.- जयराम ठाकूर, मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेश

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@