हिंदू मुलींचे अपहरण : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली दखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात होळी साजरी करत असताना दोन हिंदू अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले होते. अपहरण करून त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याची घटना घडली. या घटनेची परराष्ट्र मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारतीय उच्च आयुक्तांना यासंबंधी अहवाल देण्यास सांगितले आहे.

 

होळीच्या पूर्वसंध्येला हिंदू कुटुंबातील पीडित रविना ही अवघ्या १३ तर रीना ही १५ अवघ्या पंधरा वर्षाची आहे. या दोन अल्पवयीन मुलींचे त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी यासंबंधीची माहिती मागितली आहे. मी या घटनेसंबंधी भारतीय उच्च आयोगाकडे अहवाल मागितला आहे, असे सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले.

 

पाकिस्तान हिंदू वेलफेअर ट्रस्टचे प्रमुख संजेश धंजा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, "रविना आणि रीना या दोघींचे सिंध प्रांतातील घोटकी येथून अपहरण करून लागण लावण्यात आले व यानंतर त्यांचे धर्म बदलण्यात आले. अशा प्रकारच्या हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना पाकिस्तानात नेहमीच होत आल्या आहेत. यावर आम्ही वारंवार आवाज उठवत असतो मात्र, पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत."

 

रविना आणि रीना यांच्यासोबतच याच परिसरातील कोमल आणि सोनिया या दोन मुलींचे देखील अपहरण करण्यात आले असून जबरदस्तीने त्यांचे मुस्लिम तरुणांशी लग्न लावून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता, ये नया पाकिस्तान असल्याचे सांगणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यावर काय भुमीका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@