पश्चिम रेल्वेसाठी खुशखबर; रविवारी ब्लॉक नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019
Total Views |




मुंबई : पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. पश्चिम रेल्वेलाईनवर या रविवारी कोणताही मेगा ब्लॉक घेतला जाणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. तर देखभाल व दुरुस्तीसाठी मध्य रेल्वे आणि हार्बर लाइनवर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर आणि कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

 

रविवार, दि. २४ मार्चला पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेतला जाणार नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण या मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ४ तर हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार असून या मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. यासोबतच ब्लॉक काळात कल्याण स्थानकातील कसारा दिशेला असलेला जुना पादचारी पूल तोडण्यात येणार आहे. यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटीहून येणाऱ्या लोकलच्या वेळेवरही परिणाम होणार असल्याचे रेल्वेने सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@