काँग्रेसच्या 'या' नेत्याचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019
Total Views |


 


औरंगाबाद : काँग्रेस पक्षाने रात्री उशिरा उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत नाव नसल्याने अनेक नेत्यांची नाराजीचे सूर ओढले. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षासोबत बंड करत लोकसभा अपक्ष उमेदवार म्हणून लढवण्याची घोषणा केल्याने औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सत्तार यांनी आमदारकीसह काँग्रेसही सोडले असून त्याचा राजीनामा हा आधीच दिला असल्याचे सांगितले. आपण पक्षाशी गद्दारी करत नसून व्यक्तिस्वातंत्र्य असल्याने आपले लोकसभेत नशीब आजमावणार आहोत असे सत्तार यांनी स्पष्ट केले.

 

काँग्रेस पक्षाने रात्री उशिरा उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी सुभाष झांबड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. झांबड यांचे नाव जाहीर होताच, काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार आणि औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. आपण २०१९ ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

"पक्षासोबत आपण नाराज नसून, आपण याआधीच आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे मी कुठल्याही पक्षाचा नसून मी अपक्ष निवडणूक लढवणार." असे त्यांनी जाहीर केले. याबाबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत बोलणे झाले नाही, मात्र आपण कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणार असेही अब्दुल सत्तार यांनी जाहीर केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@