ठरलं... पुण्यातून गिरीश बापट तर बारामतीतून कांचन कुल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2019
Total Views |


 


मुंबई : २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील सहा उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत विद्यमात चार खासदारांना उमेदवारी देण्यात आली नसून त्याऐवजी नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन कुल, सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी, जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप चिखलीकर आणि दिंडोरीतून डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे शरद बनसोडे, जळगावचे ए. टी. पाटील आणि दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांना या पंचवार्षिकला उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपच्या तिसऱ्या यादीत एकूण ३६ उमेदवार जाहीर केले आहेत. यात आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, आसाम आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे. दरम्यान, ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

 

तिसऱ्या यादीत भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांना देखील उमेदवारी मिळाली असून ते ओदिशामधील पुरी येथून लढणार आहेत. यापूर्वी, भाजपने आपल्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत. यातील पहिल्या यादीत एकूण १८४ उमेवार, तिसऱ्या यादीत ३६ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर दुसरी यादी ही दीव-दमन या केंद्रशासित राज्याची जाहीर करण्यात आली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@