शिवसेनेची पहिली यादी जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2019
Total Views |


 


मुंबईभारतीय जनता पक्षप्रणीत रालोआमधील घटकपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज झालेल्या शिवसेनेने शुक्रवारी आपल्या २१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी शिवसेनेने विद्यमान खासदारांवरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून सेनेच्या १८ पैकी १७ खासदारांना पुन्हा एकदा तिकीट मिळाले आहे.

 

युतीच्या नव्या सूत्रानुसार, राज्यातील एकूण ४८ जागांपैकी २५ जागा भाजप तर २३ जागा शिवसेना लढणार आहे. भाजपने गुरूवारी राज्यातील १६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर लगेचच शिवसेनेनेही आपले २१ उमेदवार जाहीर केले. शिवसेनेच्या कोट्यातील सातारा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत तसेच, शिवसेनेला देण्यात येणाऱ्या २३ व्या जागेबाबत आणि तेथील उमेदवाराबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नसून सातारा आणि २३ व्या जागेबाबत येत्या रविवारी घोषणा करण्यात येईल, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 
 
 

शिवसेनेच्या या २१ उमेदवारांच्या यादीत विद्यमान १८ खासदारांपैकी १७ खासदारांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तसेच, उर्वरित तीन उमेदवारांपैकीही कोल्हापूरचे संजय मंडलिक यांना २०१४ नंतर पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. २०१४ मध्ये महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेलेल्या हातकणंगले मतदारसंघात यंदा सेनेच्या धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली असून हिंगोलीतून सुभाष वानखेडे यांच्याऐवजी हेमंत पाटील यांना संधी मिळाली आहे. तसेच, विद्यमान खासदारांपैकी केवळ उस्मानाबादचे रवींद्र गायकवाड यांना पत्ता कट करून ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे.

 

हे आहे शिवसेनेचे २१ उमेदवार

 

दक्षिण मुंबई - अरविंद सावंत

दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे

ठाणे - राजन विचारे

उत्तर पश्चिम मुंबई - गजानन किर्तीकर

कल्याण - श्रीकांत शिंदे

रायगड - अनंत गिते

रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत

कोल्हापूर - संजय मंडलिक

हातकणंगले - धैर्यशिल माने

नाशिक - हेमंत गोडसे

शिर्डी - सदाशिक लोखंडे

शिरुर - शिवाजीराव आढळराव पाटील

औरंगाबाद - चंद्रकांत खैरे

वाशिम - भावना गवळी

बुलडाणा - प्रतापराव जाधव

रामटेक - कृपाल तुमाने

अमरावती - आनंदराव अडसूळ

परभणी - संजय जाधव

मावळ - श्रीरंग बारणे

हिंगोली - हेमंत पाटील

उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर

 

१७व्या लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. ११, १८, २३, २९ एप्रिल आणि ६, १२ आणि १९ मे रोजी निवडणुका होणार आहेत. सर्व टप्प्यातील मतमोजणी ही २३ मे रोजी होईल. २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार टप्प्यात मतदान होणार आहे. ११ ते २९ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात मतदान होणार आहे. यंदा सर्व मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदाराला आपले मत योग्य उमेदवाराला गेले की नाही त्याची पडताळणी करण्यात येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@