पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार कसा, कॉंग्रेस नेते पित्रोडा यांचा सवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2019
Total Views |



 


नवी दिल्ली : काही लोक येऊन हल्ला करतात त्याला संपूर्ण देश कसा जबाबदार, असा प्रश्न उपस्थित करत कॉंग्रेस नेते सॅम पित्रोडां यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची पाठराखण केली आहे. पुलवामा हल्ल्यावर भाष्य करताना पित्रोडांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले पित्रोडा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. २६-११ वेळी झालेल्या मुंबई हल्ल्यावरही त्यांनी भाष्य केले होते. मुंबईत आठ जण येतात आणि दहशतवादी हल्ला करतात याला संपूर्ण पाकिस्तानला तुम्ही जबाबदार धरू शकत नाही, असे विधान त्यांनी यावेळी केले आहे.

भारताने पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या बालकोट येथील कारवाईबद्दलही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले एअर स्ट्राईकबद्दल मला फारसे माहित नाही, असे हल्ले होतच असतात. मुंबईवरदेखील हल्ला झाला होता. त्यावेळी कॉंग्रेस सरकारही विमाने पाठवू शकले असते. मात्र, तसे करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. हवाई दलाच्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, याची माहिती सरकारने द्यावी, खरेच तिनशे दहशतवादी मारले गेले आहेत. का, 'आपण नेमका कुठे हल्ला केला, असे प्रश्न त्यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केले आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांचा दाखला देत कुणीही मारले गेले नसल्याचा दावा त्यांनी केला. याबद्दल ऐकून भारतीय म्हणून मला दुःख होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@