पाकिस्तान राष्ट्रीय दिवस कार्यक्रमावर भारताचा बहिष्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2019
Total Views |




नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ला आणि काश्मिर भागात सतत होत असलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील साजरा होत असलेल्या पाकिस्तान राष्ट्रीय दिवस कार्यक्रमावर भारताने बहिष्कार टाकला आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाला हुर्रियत नेत्यांना आमंत्रित करण्यात आले असल्याने कार्यक्रमाला भारताकडून कोणीही प्रतिनिधी न पाठविण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.

शुक्रवार दि. २२ मार्च रोजी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाकडून राष्ट्रीय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पाकिस्तान उच्चायुक्तलयाकडून हुर्रियत नेत्यांना आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमाला भारताकडून कोणत्याही अधिकाऱ्याला न पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२३ मार्च हा दिवस पाकिस्तान राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. २३ मार्च १९४० रोजी लाहोर येथील अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मांडण्यात आला. हा दिवस पाकिस्तान राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या कार्यक्रमाला हुर्रियत नेत्यांची उपस्थिती असते. तसे असतानाही या कार्यक्रमासाठी दरवर्षी भारताकडून प्रतिनिधी पाठविला जात होता. २०१५ मध्ये परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर दबाव आणल्यानंतरही सीमेवरील दहशतवाद्यांच्या कुरापती थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat




@@AUTHORINFO_V1@@