गोव्यावर अजूनही शोककळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2019
Total Views |



पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोवा राज्यात पसरलेली शोककळा अद्यापही ओसरलेली नाही. गोव्यातील प्रसिद्ध ‘शिगमोत्सवा’वरही या दुखवट्याचा परिणाम जाणवून येत असून सरकारी पातळीवर साजरा केला जाणारा शिगमोत्सवही रद्द करण्यात आला आहे.

 

होळीला कोकणात शिमगा तर गोव्यात शिगमा असे म्हटले जाते. संपूर्ण गोव्यात हा शिगमा उत्साहात साजरा होतो. परंतु, नुकतेच दि. १७ मार्च रोजी गोव्याचे लोकप्रिय नेते मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले. यानंतर गोवा राज्य सरकारने ७ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. गोव्यात शिगमा हा राज्य उत्सव म्हणून सरकारी पातळीवर साजरा केला जातो. या उत्सवात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम, पुरस्कार इ. ची रेलचेल असते. परंतु, यातील काही सहयोगी संस्थांनी पर्रीकरांच्या निधनामुळे उत्सवातून माघार घेतली व त्यानंतर सरकारनेच शासकीय पातळीवरील शिगमोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला.

 

सरकारी उत्सवाखेरीज वैयक्तिक पातळीवर साजऱ्या होणाऱ्या शिगमोत्सवावरही पर्रीकरांच्या निधनाचा परिणाम जाणवत असून दरवर्षी या काळात असणारा उत्साह, धामधूम यंदा जाणवत नसल्याचे वृत्त गोव्यातील अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. यामुळे पर्रीकर यांच्या निधनाच्या दुःखातून गोवा आणि ‘गोंयकार’ अद्यापही सावरले नसल्याचे दिसत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@