क्रिकेटपटू गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2019
Total Views |




नवी दिल्ली : क्रिकेटपटू गौतम गंभीरने शुक्रवारी राजकारणात सक्रिय प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. गौतम गंभीरने भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

 
 

दरम्यान गौतम गंभीर लोकसभा निवडणूकीत नवी दिल्लीतून लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काहीकाळापासून गौतम गंभीर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, शुक्रवारी त्याने केलेल्या भाजपप्रवेशानंतर आता गंभीर लोकसभेत निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचेही सांगितले जात आहे.

 

दिल्लीतील सात जागांसाठी १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानंतर आता भाजपकड़ून या जागांवरील उमेदवारांची घोषणा केली जाऊ शकते. उमेदवारांना प्रचारासाठी जास्तीतजास्त वेळ मिळावा यासाठी जागावाटपाची लगबगही सुरू आहे. दिल्लीतील विद्यमान खासदार मीनाक्षी लेखी यांच्याविरोधात भाजपकडून गौतम गंभीर प्रमुख दावेदार मानला जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@