समझौता बॉम्बस्फोटप्रकरणी असीमानंदसह सर्व आरोपी निर्दोष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2019
Total Views |



नवी दिल्ली : २००७मध्ये घडलेल्या समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी स्वामी असीमानंद यांच्यासह चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पंचकुला येथील विशेष एनआयए कोर्टाने स्वामी असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी यांची बुधवारी निर्दोष मुक्तता केली. तब्बल १२ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. यापूर्वी असीमानंद यांची मक्का मशीद आणि अजमेर स्फोटातूनही मुक्तता करण्यात आली होती.

 

काय आहे प्रकरण?

 

दिल्लीहून लाहोरला जाणाऱ्या समझौता एक्स्प्रेसमध्ये १८ फेब्रुवारी २००७ रोजी हरियाणातील पानिपतजवळ बॉम्बस्फोट झाला होता. यात ६८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर यात ५० पेक्षा अधिक जण गंभीर झाले होते. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक नागरिक हे पाकिस्तानी होते. या प्रकरणात २०१० साली असीमानंद यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.

 

कोण आहेत असीमानंद?

 

असीमानंद हे अभिनव भारत या संघटनेचे सदस्य आहेत. असीमानंद यांचे मूळ नाव नभकुमार सरकार असे असून, ते पश्चिम बंगालमधील कामारपुकुर (जि. हुगळी) येथील रहिवासी आहेत. ते पुरुलिया (जि. बांकुरा) येथील वनवासी कल्याण आश्रमात कार्यरत असतात. दरम्यान, असीमानंद स्वयंघोषित साधू असून ते अनेक नावांनी वावरत असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@