देश होळीच्या रंगात; राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2019
Total Views |



नवी दिल्ली : देशभरात सर्वत्र होळी आणि धुलिवंदनाची धूम दिसत आहे. अवघा देश होळीच्या रंगात रंगून निघाला आहे. होळी व धुलीवंदनाच्या निमित्ताने लोक एकमेकांना शुभेच्छा देत असून सोबत रंग लावत आहेत. होळी व धूलिवंदन हा देशातील प्रमुख सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते तर दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते. प्रामुख्याने उत्तर भारतात या सणाचा मोठा उत्साह दिसून येतो.

 

देश होळीच्या रंगात असताना देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. होळीचा सण सर्वांच्या जीवनात शांती, सुख आणि समृद्धी घेऊन येऊ असे राष्ट्रपतींनी शुभेच्छा देत म्हटले आहे. तर आनंदाचा हा सण आपल्या एकतेला आणि सद्भावनेला अधिक दृढ करो अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या आहेत.

 

गुगलनेही रंगीबेरंगी डुडलच्‍या माध्‍यमातून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्‍या आहेत. भारतीय संस्‍कृतीचे प्रतीक या डुडलमध्‍ये पाहायला मिळत आहे. डुडलमध्ये तरुण-तरुणी होळी खेळताना दिसत आहेत. दरम्यान, देशात अनेक ठिकाणी दहशतवाद, चिनी मालाची होळी जाळण्यात आली. तर अनेक ठिकाणी सामाजिक भान जपत होळी साजरी करण्यात आली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@