नवी दिल्ली : प्रियांका गांधींनी लाल बहादूर शास्त्रींचा अपमान केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. स्मृती इराणी यांनी ट्विट केलेल्या एका व्हिडिओमध्ये कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी त्यांच्या गळ्यातील माळ उतरवून लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला घालत आहेत. हा या महापुरुषाचा अपमान असल्याची टीका स्मृती इराणी यांनी केली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat