'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2019
Total Views |


 


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारीत असलेला बहुचर्चित 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी लाँच झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. ओमंग कुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट विविध २३ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

एक सामान्य चहा विक्रेता ते भारताचा पंतप्रधान असा प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात हा ट्रेलर लाँच करण्यात आला. हा चित्रपट येत्या ५ एप्रिलला प्रदर्शित होणार असून विवेक ओबेरॉय सोबत बोमन इराणी, बरखा मिष्ट, मनोज जोशी, प्रशांत नारायण, जरीना वहाब, अंजन श्रीवास्तव आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@