जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; तिघांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2019
Total Views |



जम्मू-काश्मीर : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) उधमपूर येथील कॅम्पमध्ये एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला आहे. या अंधाधुन गोळीबारात तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे. बट्टल बलियान येथील सीआरपीएफच्या १८७ बटालियनच्या कॅम्पमध्ये शुल्लक कारणावरून रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबार करणाऱ्या जवानाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर येत आहे.

 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दहा वाजताच्या सुमारास कॉन्स्टेबल अजित कुमार याने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. यात या तिघांचा मृत्यू झाला असून कुमार याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुमारला लष्कराच्या दवाखान्यत हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

 

कॉन्स्टेबल अजित कुमार हा उत्तरप्रदेश राज्यातील कानपुर येथील रहिवासी आहे. तर या गोळीबारात मृत्युमुखी पडलेले हेड कॉन्स्टेबल पोकरमाल आर हे राज्यस्थान, योगेन्द्र शर्मा दिल्ली, उमेद सिंह हरियाणा येथील रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मिळताच सीआरपीएफमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@