दंगलीवेळी घर सोडून गेलेल्या हिंदूंची वापसी : योगी आदित्यनाथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2019
Total Views |



 

 


लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने मंगळवारी दोन वर्ष पूर्ण केली. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. कैराना येथील दंगलीत घर सोडावे लागलेले नागरीक पुन्हा परतल्याचा दावा त्यांनी केला.

योगी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त लखनऊ येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, "गेल्या २४ महिन्यात योगी सरकारने उत्तर प्रदेशचा चेहरा मोहरा बदलला आहे. ज्या ठिकाणी दंगली उफाळल्या होत्या विशेषतः कैरानासारख्या भागांमध्ये बहुसंख्य हिंदूंना आपले घर सोडून जावे लागले होते, ते आता परत आले आहेत.


उत्तर प्रदेशमध्ये दोन वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये ३ हजार ३०० हिंसाचाराची प्रकरणे समोर आली होती. त्यातील १२ हजार आरोपींचा जामिन रद्द करून त्यांची रवानगी पुन्हा तुरुंगात केल्याची माहिती त्यांनी दिली. योगी सरकारच्या कार्यकाळात गुंतवणूकदारांनी राज्यात येण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून गेल्या १० वर्षांच्या तुलनेत दोन वर्षांत गुंतवणूक वाढल्याचे ते म्हणाले. २०१७ मध्ये योगी सरकार स्थापन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला आळा बसला असल्याचे त्यांनी सांगितले.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@