पिनाकी चंद्रघोष देशाचे पहिले लोकपाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारतात लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी देशाला पहिले लोकपाल मिळाले आहेत. केंद्र सरकारने माजी न्यायमूर्ती पिनाकीचंद्र घोष यांची देशाच्या पहिल्या लोकपालपदी नियुक्ती केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाला मंजूरी दिली आहे.


घोष हे पुढील चार वर्ष घोष लोकपालचे अध्यक्ष असतील.
लोकपालच्या अध्यक्षांना सरन्यायाधीशांइतकाच पगार आणि दर्जा असणार आहे. देशाचे पहिले लोकपाल नियुक्त करण्यात आलेले न्या. पी. सी. घोष हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश होते. ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. घोष हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्यही आहेत.


न्या. घोष यांना मानवाधिकार कायद्याचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. दरम्यान अण्णा हजारे यांनी घोष यांच्या नियुक्तीबद्दल स्वागत केले. पी.सी. घोष यांच्या निवडीचेनंतर प्रतिक्रिया देताने ते म्हणाले " ४८ वर्षानंतर जनआंदोलनाला एक ऐतिहासिक विजय मिळाला आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@