नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2019
Total Views |





लंडन : प्रसिद्ध हिरेव्यापारी नीरव मोदी यांनी पीएनबी बॅंकेत केलेल्या घोटाळ्याप्रकरणी त्याला बुधवारी अटक करम्यात आली आहे. लंडनमधील न्यायालयाने त्याच्या पत्नीविरोधात अटकपूर्व वॉरंट बजावले होते. अखेर आज निरव मोदीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

 

नीरव मोदीला भारताकडे सोपवण्याची मागणी इंग्लंडकडे करण्यात आली होती. त्याच्याविरोधात विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे त्याला अटक करणे सोपे झाले. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नीरव मोदीविरुद्ध दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी नीरव मोदीची पत्नी आमी मोदी हिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी होते. लंडन मधील न्यायालयानेही नीरव मोदीला अटक करण्याचे आदेश दिले होते.

नीरव मोदीला लंडनच्या न्यायालयात हजर केले असून या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. स्कॉटलंड पोलीसांनी याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली आहे. १४ हजार कोटींचे कर्ज बुडवून नीरव मोदीने लंडनमध्ये पलायन केले होते. 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@