राष्ट्रवादीला पुन्हा धक्का : डॉ. भारती पवार भाजपत !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2019
Total Views |


मुंबई : एकेकाळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा भक्कम गड मानला जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात दोन्ही पक्षांना सुरुंग लागण्यास सुरुवात झाली आहे. माढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार रणजितसिंह मोहीते पाटील यांनी आपल्या पदांचा राजीनामा देत भाजपत दाखल झाले आहेत. यातच राष्ट्रवादीला दुसरा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार आता भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.

दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादीने धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर केल्याने भारती पवार नाराज आहेत. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. भारती पवार यांनी मागील लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिंडोरी मतदारसंघातून लढवली होती. यावेळी दिंडोरीची उमेदवारी न मिळाल्याने भारती पवार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.


राष्ट्रवादीने धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भारती पवार यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाचे दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी भारती पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@