देशातील प्रत्येक इमानदार व्यक्ती 'चौकीदार' : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2019
Total Views |



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील तब्बल २५ लाख चौकीदारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैं भी चौकीदार #MainBhiChowkidar हे अभियान अधिक बळकट करण्यासाठी देशातील चौकीदारांना संबोधित केले.

विरोधकांचा चौकीदार चोर है असल्याचा नारा हा नुकसान पोहोचवणारा आणि आघात पोहोचवणारा, असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील चौकिदारांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांची स्तूती करताना मोदी म्हणाले, "तुम्ही तुमचे काम पूर्णपणे इमानदारीने करत आहात. अहोरात्र तुम्ही कर्तव्याचे पालन करत असता. ही गोष्ट ऐकून मन सुखावते कि, महिलाही या कामात सक्रिय आहेत."

 

काही लोकांमुळे आम्हाला बदनाम केले जात आहे, अशा एका महिलेच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, " हे ऐकून मला दुःख होते. हे पहिल्यांदा होत नाहीये. मलाही अशाच बदनामीला सामोरे जावे लागले होते. येत्या काळात ही परिस्थिती बदलेल. चौकिदार या शब्दाचा अर्थ त्यावेळी व्यापक असेल."

 
 
 
 
 

"पाकिस्तानात हल्ला झाला तर दु:ख इथे होते"

पाकिस्तानात भारताने एअर स्ट्राईक केला तर त्याचे दु:ख इथल्या विरोधी पक्षांच्या 'टुकडे-टुकडे' गॅंगला होते. पुलवामा हल्ल्यानंतर देशासह संपूर्ण जगभरातून शोक व्यक्त करण्यात आला. मात्र, भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर आपल्याच देशातील विरोधीपक्षांनी प्रश्न उपस्थित केले.

 

इमानदार वही है चौकीदार

एका कर्मचाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संभाषण करताना तुम्ही आणि मी चौकीदाराच्या भूमिकेत असल्याचा मला आनंद आहे, असे सांगितले. यावर प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "चौकिदार प्रत्येक ठिकाणी आहे. तुम्ही जशी सेवा करता तसेच देशातील ड़ॉक्टरही सेवा करतात, तेही चौकीदार आहेत. कोणताही व्यक्ती जो आपले काम इमानदारीने करत आला आहे तो चौकीदार आहे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@