माढातून भाजपचाच खासदार निवडून येईल : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2019
Total Views |



मुंबई : विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अखेर बुधावारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चिमटा काढत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. "विजयदादांच्या आशिर्वादानेच रणजितसिंह भाजपमध्ये दाखल झाले आहेत. पुढची बोलणी त्यांच्याशीच होतील. भाजपमध्ये मोहिते-पाटील या नावाचा नेहमीच सन्मान होईल, असे सुचक विधान त्यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. भाजप हा पक्ष नसून परिवार आहे. एकत्र येऊन ताकदीने लढू, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. माढा मतदार संघात भाजपचाच खासदार निवडणून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले.

यावेळी रणजितसिंह यांनीही कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करताना आनंद होत असल्याचे सांगितले. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राचा विकास जोमाने झाल्याचे त्यांनी सांगितले. मोदी यांची काम करण्याची पद्धत भावल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@