पुण्यात आगडोंब : २५ वाहनांना आग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2019
Total Views |



पुणे : पुण्यात शिंदेवाडीतील गॅरेजसमोर उभ्या असलेल्या चार ते पाच खासगी बससह २० ते २५ वाहनांना भीषण आग लागली. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानानी दोन अग्निबंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.

 

सुमारे तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. शिंदेवाडीतील एका गॅरेजसमोर खासगी बससह काही वाहने उभी होती. सकाळी या वाहनांना भीषण आग लागली. चार ते पाच खासगी बससह २० ते २५ वाहनांना आग लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

 

अग्निशमनदलाने सव्वा तासांच्या प्रयत्नांतर आगीवर यश मिळवले. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. दरम्यान, या पूर्वीही ठाणे आणि पुण्यात गाड्यांना आगी लागण्याचे प्रकार निर्दशर्नास आले असून पुन्हा अशाप्रकारे जाळपोळ तर करण्यात आली नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@