भारतीय समजून पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्याच पायलटला मारले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भारताने विंग कमांडर अभिनंदन यांचे भारतमध्ये जल्लोषात स्वागत केले. देशातील नागरिकांनी त्यांच्या कारनाम्यांना सलाम ठोकला. पण, दुसरीकडे पाकिस्तानच्या नागरिकांनी भारतीय समजून त्यांच्याच देशाचे विंग कमांडर शहाजुद्दीन यांना मारले. अभिनंदन यांनी पाडलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ या फायटर विमानाचे पायलट होते विंग कमांडर शहाझुद्दीन.

 

अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ हे फायटर विमान पाडल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पॅराशूटद्वारे उतरलेल्या शहाजुद्दीन यांना भारतीय समजून जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना १ मार्च याच दिवशी घडली. या जबर मारहाणीतच विंग कमांडर शहाजुद्दीन यांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.

 

विशेष म्हणजे, पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ता असिफ गफूर यांनी त्यावेळेस दावा केला होता की, भारताचे २ विमान पाडले आहेत आणि २ पायलट त्यांच्या कैदेत आहेत. त्यावेळेस ते या गोष्टीपासून वंचित होते की दुसरा पायलट हा त्यांच्याच देशाचा आहे. दुपारी भारतीय हवाई दलाने जेव्हा पत्रकार परिषदेत हे सांगितले की एकच भारतीय पायलट परत येऊ शकला नाही. तेव्हा पाकिस्तानने हालचाल करायला सुरुवात केली. सध्या या गोष्टीवर पाकिस्तानकडून कोणतीही वाच्यता केली जात नाही आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@