पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट; सुरक्षा यंत्रणेत वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2019
Total Views |


 


महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशमधील पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवली

 

मुंबई : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांना 'मारा अन्यथा मरा'चे आदेश देण्यात आल्यानंतर देशातील महत्वाच्या ठिकाणावर हाय अलर्ट जारी करण्यात आहेत. गुप्तचर यंत्रणांनी अशाच प्रकारचा हाय अलर्ट पश्चिम रेल्वेलादेखील दिला आहे. यानुसार, महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशमधील पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सुरक्षा यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर, पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या महानिरीक्षक कार्यालयाने या तिन्ही राज्यातील पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर येणाऱ्या सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर, विशेष करुन जम्मूकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांवर बारिक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

२२ फेब्रुवारीला चर्चगेटमधील महानिरीक्षक कार्यालयाकडून मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या प्रमुखांना पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार, देशात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली असून रेल्वे स्थानके, मंदिरे तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटीला टार्गेट केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकावर सुरक्षा यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@