कृषी व्यवसाय मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन सेवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2019
Total Views |



मुंबई : राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने कृषी व्यवसाय मार्गदर्शन सेवा आणि हेल्पलाईन सुविधा सुरू केली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे एकाच वेळी राज्यातील ५ हजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती आणि संदेश पोहचविण्यात येणार आहे.

 

रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने सुरु केलेल्या १८०० ४१९ ८८०० या हेल्पलाईन सेवेचा शुभारंभ सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. १८०० ४१९ ८८०० या टोल फ्री क्रमांकावर सहकारी संस्थांना व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन व व्यवसायासंदर्भातील अडचणी सोडविल्या जाणार आहेत.

 

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि रिलायन्स सोशल फाऊंडेशन यांच्यामध्ये कार्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत करार झाला आहे. त्यानुसार राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना कृषी आधारित व्यवसाय उभारणीसाठी रिलायन्स फाऊंडेशनमार्फत संवाद तंत्रज्ञानाद्वारे कृषी व्यवसाय मार्गदर्शन सेवा सुरू करण्यात आली आहे.

 

या माध्यमातून ऑडीओ - व्हॉइस संदेश, संस्थांनी सुरू केलेल्या व्यवसायांचे व्हिडिओ संदेश, ॲपद्वारे कृषी व्यवसायावर चर्चा व मार्गदर्शन करणे, कृषी क्षेत्रातील घडामोडींची माहिती देणे, ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे कृषी व्यवसायांबाबत अडचणी - चर्चा घडवून आणणे, यशोगाथा इ. चे प्रसारण करणे, कार्यक्षेत्रात तज्ञ मंडळीमार्फत कृषी व्यवसायांवर, अडचणींवर मार्गदर्शन करणे शक्य होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@