'हृदयांतर'नंतर विक्रम फडणीसचा 'स्माईल प्लिज'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2019
Total Views |


 


मुंबई : 'हृदयांतर'च्या यशानंतर दिग्दर्शक विक्रम फडणीस आता मराठीमध्ये घेऊन येत आहेत 'स्माईल प्लिज'. शुक्रवारी बॉलीवूड अभिनेता ह्रितिक रोशन याच्या हस्ते या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. बॉलिवूडमध्ये फॅशन डिझायनर म्हणून प्रसिद्ध असलेले विक्रम फडणीस यांचा दिग्दर्शक म्हणून हा मराठीतील दुसराच चित्रपट. 'हृदयांतर' या चित्रपटानंतर 'स्माईल प्लिज' या चित्रपटाद्वारे आपल्या आईची गोष्ट एका गोष्टीत गुंफून सांगण्याचा प्रयत्न विक्रमने केला आहे.

 

माणूस आयुष्यभर आनंदाच्या शोधात असतो पण आनंदाचा अर्थ हा प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो अशी या चित्रपटाची वन लाईन आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्त बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर आणि तृप्ती खामकर अशी तंगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. तसेच, 'रिंगा रिंगा' चित्रपटानंतर अदिती गोवित्रीकर बऱ्याच कालावधीनंतर मराठी चित्रपटामध्ये दिसणार आहे. याबरोबरच सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे 'हृदयांतर'मध्ये जसा ह्रितिक रोशनचा कॅमिओ पाहायला मिळाला होता, तसाच या चित्रपटामध्येही पाहायला मिळेल का? "विक्रम हा त्याच्या चित्रपटाबद्दल प्रचंड पॅशनेट आहे. त्यामुळेच त्याच्यासोबत काम करणे हा एक वेगळा अनुभव असतो." असे प्रमुख पाहुणा म्हणून आलेल्या ह्रतिक रोशनने सांगितले.

 

संगीतकार रोहन-रोहन यांची जोडी या चित्रपटाला संगीत देत आहेत. तर मंदार चोळकरने गाणी लिहिली आहेत. कोरिओग्राफर बोस्को या चित्रपटातील एक गाणे कोरिओग्राफ करणार आहे. त्याशिवाय रोहन मपुसकर याने कास्टिंगचे काम पाहिले आहे. शुक्रवारपासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्याचा विक्रमचा मानस आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@