मैं रहूँ या ना रहूँ, भारत ये रहना चाहिए...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2019
Total Views |

 

 
 
  
प्रसून जोशी यांनी ‘मणिकर्णिका’साठी लिहिलेल्या गीताचे शब्द आहेत - ‘मैं रहूँ या ना रहूँ, भारत ये रहना चाहिए।’ हे इतके सुंदर गीत आहे की, प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना उचंबळून आल्याशिवाय राहणार नाही. यात कोणालाही आक्षेप घेण्यासारखे काय आहे? परंतु, वामपंथीयांना आक्षेप आहे. कदाचित त्यांच्या भावना, ‘भारत तेरे टुकड़े होंगे’, ‘इंशा अल्लाह इंशा अल्लाह’ किंवा ‘भारत की बर्बादी तक जंग चलेगी, जंग चलेगी’ सारख्या नाऱ्यांमध्ये व्यवस्थित अभिव्यक्त होत असाव्यात. म्हणून यांना ‘मणिकर्णिका’च्या ‘मैं रहूँ या ना रहूँ, भारत ये रहना चाहिए’ गाण्यावर आक्षेप आहे.
 

माझ्या परिचित कुटुंबातील एक मुलगी जयपूरला शिकते. नुकत्याच ‘जयपूर लिटरेचर फेस्टिवल’मध्ये ती प्रबंधक (व्हॉलेंटीअर) म्हणून होती. पहिल्या दिवसाचा तिचा अनुभव तिने सांगितला की, सर्व चर्चासत्रांमध्ये, वक्त्यांमध्ये आणि प्रबंधकांमध्येही ‘डाव्यां’चा प्रभाव आणि वर्चस्व दिसत होते. मला हे ऐकून आश्चर्य वाटले नाही, अपेक्षितच होते. परंतु, तिने आणखी एक अनुभव सांगितला. तिची गटप्रमुख (टीम लीडर), जी कट्टर वामपंथी होती, गप्पागोष्टींमध्ये म्हणाली की, “यावर्षी आम्ही प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांना फेस्टिवलमध्ये आमंत्रित केले नाही. कारण, ते आता ‘राईटविंगर’ (उजवे) झाले आहेत.” त्यावर ती विद्यार्थिनी म्हणाली की, “‘राईटविंगर’ खरेच का इतके वाईट किंवा खराब आहेत?” त्यावर ती गटप्रमुख म्हणाली की, “प्रसूनजींनी ‘रंग दे बसंती’ चित्रपटासाठी गीत लिहिले, तिथपर्यंत ठीक होते. कारण, त्यात क्रांतीची चर्चा होती. परंतु, आता त्यांनी ‘मणिकर्णिका’साठी गीत लिहिले आहे.” यावर ती विद्यार्थिनी म्हणाली की, “यात आक्षेपार्ह काय आहे?” त्या वामपंथी कार्यकर्तीचे उत्तर होते, “या देशात चित्रपट, साहित्य, नाटक, गीत या सर्वांची सुरुवात ‘डाव्यां’नीच केली आहे. इतरांचे हे काम नाही. आता ‘लिट-फेस्ट’मध्ये कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही, हा आयोजकांचा अधिकार आहे.”

 

दोन वर्षांपूर्वी झालेल्या ‘जयपूर लिट-फेस्ट’मध्ये, डाव्यांच्या कडव्या विरोधानंतरही मला व दत्तात्रेय होसबळेंना निमंत्रित करणे तसेच यावर्षी रमेश पतंगेंना आमंत्रित करणे, हा आयोजकांचा निर्णय आहे. यावर्षीदेखील आयोजकांनी प्रसून जोशींना डाव्यांच्या विरोधानंतरही आमंत्रित केले होते. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते तिथे जाऊ शकले नाहीत. परंतु, वामपंथी विचार जर असा असेल की, ‘मणिकर्णिका’साठी गीत लिहिल्यामुळे प्रसून जोशी आता ‘राईटविंगर’ झाले आहेत, म्हणून त्यांना निमंत्रित करायला नको, तर हा वैचारिक संकुचितपणा निश्चितच अभारतीय आहे. हा उर्मट अहंकार आणि ही संकुचित वृत्ती डाव्यांचा मूळ स्वभाव आहे. परंतु, हे लोक स्वत:ला उदार, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षक वगैरे म्हणताना थकत नाहीत, ही विसंगती आपण लक्षात घेतली पाहिजेबहुतेक वामपंथी, दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणेही निषिद्ध अथवा पाप मानतात (अर्थात, ते पाप-पुण्यावर विश्वास ठेवत असतील तर...). म्हणून दोन वर्षांपूर्वी ‘जयपूर लिट-फेस्ट’मध्ये संघाच्या अधिकाऱ्यांना प्रथमच बोलाविण्यात आले, तर या वामपंथीयांचा संताप तळपायातून मस्तकात गेला होता. अनेक प्रकारांचा विरोध आणि अडथळ्यांचा सामना करत आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर ज्या संघाचे जनसमर्थन आणि जनसहभाग सतत वाढत आहे, त्या संघाला आपले विचार मांडण्याच्या संधीला, ज्यांचा जनाधार सतत घटत आहे, असे असहिष्णू वामपंथी नेते विरोध करीत होते. दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणे, समजून घेण्याचा प्रयत्न करणे याचा अर्थ ते विचार स्वीकारणे, असा होत नाही. परंतु, या अलोकशाही विचारांच्या असहिष्णू लोकांच्या दुनियेत, डाव्या विचारांशिवाय इतरांच्या विचारांना (अल्टरनेट नॅरेटिव्ह) स्थानच नाही आहे. म्हणूनच सीताराम येचुरी आणि त्यांच्या काही डाव्या नेत्यांनी, ‘जयपूर लिट-फेस्ट’मध्येआयोजकांनी संघाच्या लोकांना बोलावले म्हणून बहिष्कार टाकला होता.

 

 
 

चित्रपट निर्माते व लेखक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘अर्बन नक्सल’ पुस्तकात त्यांनी एक अनुभव लिहिला आहे. ‘बुद्धा इन ट्रॅफिक जाम’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी ते जादवपूर विद्यापीठात (बंगाल) गेले होते. तिथे त्यांना प्रचंड विरोध झाला. त्यांच्या मोटारकारची तोडफोड करण्यात आली. त्यांच्यावर हल्लादेखील झाला. असा हिंसक विरोध करणाऱ्या सर्व वामपंथी विद्यार्थिनी होत्या. त्यांचा नारा होता - ‘ब्लडी फॅसिस्ट ब्राह्मण वापिस जाओ!’विवेक अग्निहोत्री जोपर्यंत कम्युनिझमचा विरोध करीत नव्हते, तोपर्यंत ते एक प्रतिष्ठित चित्रपट निर्माता होते, कलाकार होते आणि त्यांनी नक्सल्यांचा बुरखा फाडला, तर लगेच ते ‘ब्लडी, फॅसिस्ट आणि ब्राह्मण’ झालेत! त्या आंदोलनकर्त्यांना अग्निहोत्री यांनी म्हटले, “मी माझा चित्रपट बघण्यासाठी आलो आहे. तुम्हाला बघायचा नसेल तर नका बघू.” त्यावर उत्तर आले, “तुम्ही इथे कुठलाच चित्रपट दाखवू शकत नाही. येथे दुसऱ्या (कम्युनिस्टशिवाय इतर) विचारांना स्थानच नाही.” हा प्रसंग २०१६ च्या मार्च महिन्यातला आहे. आता परत गटप्रमुखाच्या वक्तव्याकडे वळू. प्रसून जोशी यांनी ‘मणिकर्णिका’साठी कुठले गीत लिहिले, माहीत आहे? या गीताचे शब्द आहेत, ‘मैं रहूँ या ना रहूँ, भारत ये रहना चाहिए।’ हे इतके सुंदर गीत आहे की, प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना उचंबळून आल्याशिवाय राहणार नाही. यात कोणालाही आक्षेप घेण्यासारखे काय आहे? परंतु, वामपंथीयांना आक्षेप आहे. कदाचित त्यांच्या भावना, ‘भारत तेरे टुकड़े होंगे,’ ‘इंशा अल्लाह इंशा अल्लाह’ किंवा ‘भारत की बर्बादी तक जंग चलेगी, जंग चलेगी’सारख्या नाऱ्यांमध्ये व्यवस्थित अभिव्यक्त होत असाव्यात. म्हणून यांना ‘मणिकर्णिका’च्या ‘मैं रहूँ या ना रहूँ, भारत ये रहना चाहिए’ गाण्यावर आक्षेप आहे. म्हणून, या वामपंथीयांना ‘भारत माता की जय’ हा नारा फॅसिस्ट विचारांचीच अभिव्यक्ती वाटणार ना!

 

सेमेटिक मूळ असलेल्या सर्व रिलिजन किंवा विचारप्रवाहांचे हे वैशिष्ट्य आहे की, माझेच ‘सत्य’ सत्य आहे. बाकी सर्व असत्य. तुम्ही आमच्या ‘सत्या’सोबत आले, तर ठीक आहे अन्यथा तुम्हाला विचार करण्याचा, बोलण्याचा, अभिव्यक्तीचा, एवढेच नाही, तर जगण्याचाही अधिकार नाही. ही असहिष्णुता, अनुदारता पूर्णत: अभारतीय आहे. भारताचा विचार अध्यात्माधारित असल्यामुळेच तो सर्वसमावेशी (इन्क्लुसिव्ह) आणि उदार आहे१८९७ साली स्वामी विवेकानंद, अमेरिका व युरोपमध्येभारताचा आणि हिंदुत्वाचा डंका वाजवून, गौरव वाढवून भारतात परत येत होते, तेव्हा इंग्लंडहून प्रस्थान करण्यापूर्वी त्यांना एका इंग्रज मित्राने विचारले,“विकसित, ऐश्वर्यशाली तसेच शक्तिसंपन्न पाश्चात्त्य देशांमध्ये चार वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर आता तुम्हाला तुमची मातृभूमी कशी वाटेल?” यावर त्यांचे उत्तर अतिशय मार्मिक होते. “स्वदेश सोडून येण्यापूर्वी मी भारतावर फक्त प्रेमच करत होतो. परंतु, आता माझ्यासाठी भारतातील हवा, इतकेच नव्हे, तर भारताचाप्रत्येक धुलिकण स्वर्गाहूनही अधिक पवित्र आहे. भारतभूमी पवित्र भूमी आहे. ती माझी आई आहे. भारत माझे तीर्थ आहे.”

 
 

 
 

...दूरवरून जसा स्वामींना भारताचा समुद्रकिनारा दिसला, त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्या किनाऱ्याकडे ते हात जोडून बघत राहिले. जणू काही साक्षात भारतमातेचे ते दर्शन करीत असावे. जहाज किनाऱ्यावर लागताच, एखाद्या वेड्यासारखे स्वामीजी डेकवरून खाली उतरले आणि भारताच्या भूमीवर पाय ठेवताच साष्टांग दंडवत घालून त्या धुळीत लोळू लागले. जणू काही एखादे मूल आपल्या आईच्या कुशीत शिरले असावे. त्यांच्या मुखातून सहजतेने शब्द बाहेर पडले, “आईच्या कुशीत माझ्या मनातील सर्व किल्मिषं धुवून निघाली आहेत.” वारंवार ते भूमीला नमन करत होते, भारतमातेचा जयकार करत होते. देशभक्तीच्या या गंगेत अवगाहन करणारा जनसमुदाय, हे दृश्य बघून आत्मविभोर झाला होताप्रश्न असा आहे की, भारताच्या कुशीत जन्म घेऊन, भारताच्याच भूमीचे अन्न, जल, हवा भक्षण करून, भारताच्या करदात्यांच्या पैशावर पोषित उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिकून एक अशी जमात का फळत-फुलत आहे? त्यांना ‘भारत तेरे टुकड़े होंगे’ किंवा ‘भारत की बर्बादी’चे नारे मंजूर आहेत. परंतु, ‘मैं रहूँ या ना रहूँ, भारत ये रहना चाहिए...’ या गाण्याची इतकी चीड का म्हणून? भारतातील सर्व देशभक्त लोकांनी विचार करण्याची वेळ आली आहे. या ‘अभारतीय’ विचारांना स्वत:च्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी प्रोत्साहन अथवा संरक्षण देणाऱ्या राजकीय पक्षांनी किंवा या वामपंथी विचारकांना आपल्या पक्षीय वैचारिक कार्यासाठी ‘आऊटसोर्स’ करणाऱ्या राजकीय पक्षांनी, वेळीच हा धोका ओळखायला हवा. नाहीतर, भारताच्या देशभक्त जनतेला अशा राजकीय पक्षांबाबत वेगळा विचार करण्याची पाळी येईल.

 

-डॉ. मनमोहन वैद्य

(लेखक हे रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह आहेत.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@