एफ-१६चा गैरवापर ; अमेरिकेचा पाकड्यांना सवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : पाकिस्तानने अमेरिकेचे एफ-१६ हे विमान भारताविरुद्ध वापरल्याबाबत अमेरिकेने पाकस्तानला जाब विचारला आहे. अमेरिकेने पाकिस्तानशी एफ-१६ बाबत केलेल्या 'एंड युजर' करारानुसार, दहशतवादाविरोधातल्या लढ्यासाठी ही अत्याधुनिक विमाने अमेरिकेने पाकिस्तानला पुरवली होती. मात्र, या कराराचे उल्लंघन करत पाकने भारतीय हवाई हद्दीत घूसखोरी करत भारतीय हवाई दलाच्या विमानांवर हल्ला केला होता. यामुळे अमेरिकेने संताप व्यक्त केले आहे.

 

भारताने एफ १६च्या वापराचे पुरावेच सादर केले होते. पाकिस्तानने मात्र एफ १६ वापरण्याला नकार दिला आहे. पण भारताने एफ १६ च्या वापराचे पुरावेच भर पत्रकार परिषदेत सादर केले. त्याप्रमाणे, भारताकडे रडार फुटप्रिंट असल्याचेही जाहीर केले आहे. अमेरिकेतील राज्य विभागाच्या प्रवक्त्याने याबाबत बोलताना सांगितले की, भारत आणि पाकिस्तान दरम्यान घडलेल्या घटनाक्रमाची आम्हाला माहिती आहे. आम्ही पाकिस्तानने केलेल्या दाव्याची पडताळणी करत आहोत. पाकिस्ताने एफ-१६ बाबतचा करार भंग केल्याबाबतची माहिती मिळालेली आहे. मात्र, गोपनीयतेच्या अटीमुळे आम्ही यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@