शीना बोरा हत्याप्रकरण : मुख्य आरोपी पीटरला ह्रदयविकाराचा झटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी पीटर मुखर्जीला ह्रदयविकाराचा झटका आला आहे. ह्रदय विकाराच्या शस्त्रक्रियेसाठी पीटरला खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी सोमवारी सीबीआय न्यायालयाने परवानगी दिली. पीटर मुखर्जी हा शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तसेच शीनाची आई इंद्राणी मुखर्जीचा पीटर हा तिसरा पती आहे. शीना बोरा हत्याप्रकरणातील पीटर मुखर्जी हा इंद्राणीचा सहआरोपी असून तो सध्या आर्थर रोड कारागृहात आहे.
 

इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी या दोघांवर सध्या खटला सुरु आहे. छातीत दुखत असल्यामुळे पीटरला १६ मार्च रोजी जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर १८ मार्च रोजी पीटर मुखर्जीची अँजिओग्राफी करण्यात आली. पीटरवर अँजोप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सीबीआय न्यायालयातील विशेष न्यायाधीश जे.सी जगदाळे यांच्यासमोर डॉक्टरांनी दिलेला अहवाल सादर करण्यात आला. पीटर मुखर्जीच्या वकिलांनी पीटरच्या पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्याची परवानगी मागितली. उपचारांसाठी लागणारा खर्च पीटर मुखर्जी स्वत:च करतील. असे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.

 

पीटर मुखर्जीला खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातील पीटर मुखर्जी हा सायलंट किलर असल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले होते. १० दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणी दरम्यान सीबीआयने हा दावा केला होता. शीना बोरा हत्याप्रकरणी पीटर मुखर्जीला जामीन मिळू नये. अशी विनंती सीबाआयने न्यायालयाला केली. पीटर मुखर्जी विरोधात सीबीआयकडे पुरेसे पुरावे आहेत. असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@