धारावीतील कुंभार समाजाच्या कलेला आधुनिक कलाकुसरीची जोड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2019
Total Views |



 

मुंबई : धारावीतील कुंभार समाज पारंपरिक पद्धतीने मातीची भांडी तयार करण्याचे काम करतो. यामुळे त्याला भावही कमी मिळतो तसेच, इतरही समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांमधून त्यांची सुटका होणार असून, त्यांना आधुनिक कलाकुसरीची जोड मिळणार आहे. यासाठी ‘संकल्प सिद्धी ट्रस्ट’च्या कार्यकारी विश्वस्त दिव्या ढोले यांनी पुढाकार घेतला आहे.




 

धारावी परिसरात गरीब व हातावर पोट असणार्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी लघुउद्योग पाहायला मिळतात. कुंभार वर्षानुवर्षे मडकी घडवित आहेत. परंतु, ते पारंपरिक पद्धतीने काम करीत असल्यामुळे खूप श्रम घ्यावे लागतात आणि वेळही जास्त लागतो. जुन्या पद्धतीने बनविलेल्या भांड्यांना भावही कमी मिळतो. या सर्व बाबी दिव्या ढोले यांना आढळल्या. त्यांनी या कारागिरांना प्रशिक्षण मिळावे, सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला त्याला अखेर यश आले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@