उन्मेष जोशींची मालमत्ता जप्त, तीन बँकांचे ६८ कोटी थकवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : तीन सरकारी बँकांचे ६८ कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवल्यामुळे उन्मेष जोशी यांची कुर्ला आणि लोणावळा येथे असलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. उन्मेष जोशी हे शिवसेना नेते मनोहर यांचे सुपुत्र आहेत. उन्मेष जोशांसह त्यांच्या कुटुंबियांचीही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
 

बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या तीन बँकांकडून कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टने कर्जे घेतली होती. त्यासाठी उन्मेष जोशी त्यांची पत्नी माधवी जोशी, आई अनघा मनोहर जोशी आणि कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शन हे हमीदार होते. कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टने कर्ज फेडल्यामुळे बँकांनी २०१७ सालापासून मालमत्तेवर जप्ती आणण्याची कारवाई सुरु केली होती. याप्रकरणी कर्जदार आणि हमीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. कर्ज न फेडल्यामुळे वित्तीय मालमत्तेची सुरक्षितता आणि सुरक्षा हित अंमलबजावणी नियम २००२ मधील तरतुदी नुसार मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. अशी माहिती बँक ऑफ महाराष्ट्रच्या उप मुख्य व्यवस्थापकांनी दिली.

 

कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टने बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेकडून १२ कोटी ७९ लाख आणि अन्य तीन कोटी लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेकडून ३८ कोटी ६३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. बँक ऑफ इंडियाचे १३ कोटी १८ लाख रुपये कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टने थकवले आहेत. अशी माहिती बँक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या बँकांकडून मालमत्ता जप्ती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@