आगे आगे देखो, होता है क्या..! मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2019
Total Views |


 


मुंबई : २०१४ मध्ये होती त्यापेक्षा मोठी लाट या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आहे. विविध पक्षांतील प्रभावी नेते भाजपमध्ये येत आहेत, येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे, आगे आगे देखो, होता है क्या, असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप प्रदेश कार्यालयात माध्यम विभागाचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी वार्तालाप करत होते.

 

यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, प्रदेश सचिव मनोज पांगारकर, प्रवक्ते माधव भांडारी, केशव उपाध्ये, अतुल शाह, विश्वास पाठक, आ. भाई गिरकर, राज पुरोहित, अनिल बोंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केशव उपाध्ये यांच्या पुढाकाराने तयार केलेल्या भाजपा संदर्भ’ या लोकसभा - विधानसभा निवडणूक आकडेवारीच्या संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तसेच अतुल शाह यांनी तयार केलेल्या ‘सीएम चषक’ या कॉफीटेबल बुकचेही प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा सरकार स्थापन झाले पाहिजे, अशी जनतेची महाराष्ट्रासह देशभर मानसिकता असून यावेळी राज्यात भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह सर्व मित्रपक्षांची महायुती २०१४ च्या पेक्षा अधिक विक्रमी यश मिळवेल, असा दावा त्यांनी केला.

 

विविध पक्षांतील प्रभावी नेते भाजपमध्ये येत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालीच देश प्रगती करू शकेल, याची या नेत्यांना खात्री वाटते. भाजप-शिवसेनेचे चार संयुक्त कार्यकर्ता मेळावे झाले त्यामध्येही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह होता. युतीमध्ये पुन्हा जुना उत्साह संचारला असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांच्याशी आपली चर्चा झाली असून ते युतीसोबतच आहेत व ते २४ मार्चच्या पहिल्या प्रचारसभेला असतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. देशात लोकसभा निवडणुकीत पहिला क्रमांक भाजपच्या नेतृत्वाखाली रालोआचाच असेल हे आता विरोधी पक्षांनीही मान्य केले असून त्यांच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा सुरू असल्याचा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@