नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2019
Total Views |


 


लंडन : पंजाब नॅशनल बँक घोटळ्यातील मुख्य फरार आरोपी नीरव मोदी याला अटक करण्याचा भारताचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण नीरव मोदीला पकडण्यासाठी लंडन न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नीरव मोदीला लंडन पोलीस अटक करु शकतात. सीबीआयने इंटरपोल आणि लंडनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीसचा संदर्भ देत कारवाई करत त्याला अटक करण्याची मागणी केली होती.

 

भारतीय एजन्सीज गेल्या अनेक महिन्यांपासून नीरव मोदीला प्रत्यार्पण करायला लावण्यासाठी प्रयत्न करत होत्या. भारताच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी ईडी आणि सीबीआयच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाने यूके सरकारला ऑगस्ट २०१८ मध्ये अर्ज केला आहे. परंतु हा अर्ज विचाराधीन असून त्याव्यतिरिक्त कोणतीही माहिती नसल्याचं यूके सरकारकडून सांगण्यात आले होते.

 

काही दिवसांपूर्वी नीरव मोदीचा लंडनमध्ये मुक्त संचार करत असल्याचे समोर आले आहे. भारतातून पोबारा करुन गेलेला नीरव मोदी लंडनमध्ये बिनबोभाटपणे वावरत आहे. 'द टेलिग्राफ' या लंडनमधील वृत्तपत्राने याबाबत दावा केला होता, तसेच त्यांनी नीरव मोदीशी बोलण्याचा प्रयत्नदेखील केला होता. त्याचा व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@