भारत व अमेरिका तयार करणार एकत्रितरीत्या ड्रोन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2019
Total Views |

 


 
 

पेटागॉन व भारतीय अधिकाऱ्यांत महत्त्वपूर्ण चर्चा

 

वॉशिंग्टन : अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या पेटागॉनमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने भारत आणि अमेरिकेतील सुरक्षा संबंधांबाबत मोठे विधान केले आहे. अधिकारी म्हणाले की, सुरक्षा सहकार्यासाठी विमानांच्या देखरेखीसह मानवरहित हवाई यान म्हणजेच ड्रोन आणि हलक्या हत्यारविषयक तांत्रिक प्रकल्पांमध्ये सह-विकासाची एक योजना तयार करण्यात आली आहे. अमेरिकेत झालेल्या एका बैठकीत भारतीय संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव अजय कुमार यांनीदेखील भाग घेतला.

 

दोन्ही देशांतील सुरक्षा अधिकाऱ्यांचे हे वक्तव्य वॉशिंग्टनमध्ये नव्या युगातील सुरक्षा तंत्रज्ञान आणि व्यापारविषयक चर्चेदरम्यान (डीटीटीआय) आले. भारत व अमेरिकेतील डीटीटीआय बैठकीत संपूर्णपणे अमेरिका आणि भारतीय उद्योगांच्या एकत्रितपणे काम करण्यावर आणि पुढच्या पिढीतील तंत्रज्ञानाला विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. पेटागॉनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, “आम्ही ज्या प्रकल्पावर चर्चा केली, ती छोट्या व हलक्या हवाई प्रक्षेपण यान म्हणजेच ड्रोनसंबंधित होती. अमेरिकेच्या सहकार्याने तयार करण्यात येणारे ड्रोन्स किफायतशीर असतील,” असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

 

सुरक्षा उत्पादन विभागाचे सचिव अजय कुमार यांच्याबरोबरच्या बैठकीचे सहअध्यक्ष असलेल्या अॅलन लॉर्ड यांनी सांगितले की, “एकूणच आम्ही या प्रकल्पाकडे एक कुशल, प्रभावी आणि युद्धसमयी अतिरिक्त क्षमता प्रदान करण्याच्या रूपात पाहत आहोत.” ते म्हणाले की, “या ड्रोन प्रकल्पामुळे मानवी सहकार्य-आपत्ती नियंत्रण, सीमेवरील निरीक्षण आणि गुंफा, सुरूंग आदींच्या निरीक्षणात मदत मिळेल.” दरम्यान, ही चर्चा मुख्यत्वे अमेरिकेच्या वायुसेना संशोधन प्रयोगशाळा आणि भारताच्या डीआरडीओदरम्यानची आहे. एप्रिलमध्ये आता दोन्ही बाजू तांत्रिक नियोजनासंबंधित दस्तावेजांवर स्वाक्षरी करणार आहेत. डीटीटीआय अंतर्गत दोन्ही देशांकडे सह-विकास आणि सह-उत्पादन क्षेत्रांच्या पाहणीसाठी कितीतरी संयुक्त कार्यदल आहेत. ते जॉईंट वर्किंग ग्रुप, एअरक्राफ्ट कॅरिअर टेक्नॉलॉजी, लॅण्ड सिस्टीम, नेव्हल सिस्टीम, एअर सिस्टीम आणि अन्य ठिकाणी कामाला येईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@