काश्मीरला विशेष दर्जा का? - इंद्रेशकुमार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
 

हिंदी विवेकच्या आर्य विचार दर्शन विशेषांकाचे प्रकाशन

 

मुंबई : “आपण सगळे एकाच मातृभूमीचे नागरिक आहोत. काश्मिरातील नागरिक भारतातील कोणत्याही ठिकाणी हक्क सांगू शकतो, तिथे स्थायिक होऊ शकतो, जमीन विकत घेऊ शकतो. मग त्याचप्रमाणे अन्य भारतातील नागरिकांना जम्मू-काश्मिरमध्ये हा हक्क का मिळत नाही? सर्व राज्ये एकाच मातृभूमीचा हिस्सा असताना काश्मीरला विशिष्ट दर्जा का?” असा परखड प्रश्न मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे संयोजक इंद्रेशकुमार यांनी उपस्थित केला. हिंदी विवेकच्या 'आर्य समाज विचार दर्शन' विशेषांक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. यावेळी मंचावर हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, 'गुरुकुल एटा'चे आचार्य डॉ. बगीश शर्मा, हिंदी विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर, आर्य प्रतिनिधी सभेचे प्रधान मिठाईलाल सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

 

इंद्रेशकुमार पुढे म्हणाले, "एका विशिष्ट पक्षाच्या संघर्षामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले असे सांगितले जाते. वास्तविक भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेकांनी रक्त सांडले आहे. त्या एका पक्षाच्या प्रयत्नांमुळे फक्त देशविभाजनाच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या व त्याचे भीषण परिणाम तत्कालीन समाजाने भोगले. अत्याचार, हत्या, अगणित धर्मांतरे झाली. त्यातून पाकिस्तान जन्माला आला. मात्र, आता पाकने आपल्या कारवाया, दहशतवाद्यांना आश्रय देणे, त्यांना प्रशिक्षण देणे, भारताला त्रास देणे थांबवले नाही तर काय होऊ शकते याचा धडा त्याला भारताने शिकवला आहे. अनेक धर्म, मतपंथ, उपासनापद्धतींचा भारताने स्वीकार केला. अनेक विचारांना या मातृभूमीमध्ये सामावून घेतले. मात्र अशा सर्वसमावेशक धर्माचा अवलंब करणारे संकुचित ठरत आहेत आणि जे खऱ्या अर्थाने संकुचित आहेत ते धर्म आज लोकांना उदारमतवादी वाटत आहेत. आपल्याला जर कोणी कट्टर समजत असेल तर ते चूक आहे. हा समज पुसून काढण्यासाठी आपल्याला जागृत व्हावे लागेल."

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@