८१ टक्के लोकांची पंतप्रधान मोदींना पसंती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2019
Total Views |



दै. मुंबई तरुण भारत'च्या कल चाचणीत वाचकांची पुन्हा मोदींनाच पसंती

 

मुंबई : देशाच्या सतराव्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक सर्वेक्षण आणि जनतेचा कौल जाणून घेतला जात आहे. यामध्ये राजकीय पक्षासोबतच माध्यमांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अशाच प्रकारचा कौल दै. मुंबई तरुण भारत'ने देखील घेतला होता. पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार कोण? असा प्रश्न वाचकांना विचारण्यात आला होता. वाचकांनी दिलेल्या कौलानुसार तब्बल ८१ टक्के वाचकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दिली तर १९ टक्के वाचकांनी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिली.
 
 

दि. ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार पडणार असून २३ मे रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर 'मुंबई तरुण भारत'च्या 'महा एमटीबी' या अधिकृत फेसबुक पेजवर हा कौल घेतला गेला होता. यात ७६७ वाचकांनी सहभाग घेतला होता. यापैकी ८१ टक्के म्हणजे ६२२ जणांनी मोदींच्या नावाला पसंती दिली, तर १४५ जणांनी राहुल यांना पसंती दिली. देशाच्या इतर सर्वेक्षणामध्येदेखील नरेंद्र मोदी यांच्या नावालाच पसंती मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या रणधुमाळीत कोण बाजी मारते हे येत्या २३ मे रोजीच समजेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@