रविवारी तिन्ही मार्गांवर असेल मेगाब्लॉक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2019
Total Views |


 


मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सायन स्थानकांदरम्यान रोड ओव्हर पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवार आणि रविवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते कुर्ला दरम्यान अप आणि डाउन धिम्या-जलद मार्गावर रात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यत गर्डरचे काम करण्यात येणार आहे. परिणामी डाउन मार्गावरील रात्री १२.१८ आणि १२.३१ची सीएसएमटी ते ठाणे-कुर्ला लोकल, अप मार्गावरील कुर्ला ते सीएसएमटी पहाटे ५.५४ची लोकल रद्द करण्यात आलेली आहे. शनिवारी रात्री ११.१२ची कल्याण-सीएसएमटी लोकल कुर्ला स्थानकापर्यतच चालविण्यात येणार आहे. तर अंबरनाथ-सीएसएमटी रा.१०.०१ ची लोकल ठाणे स्थानकापर्यत धावणार आहे.

 
 

आसनगाव ते कसारा दरम्यान ओव्हरहेड वायरचे जाळे आणि पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याकरिता रविवारी सकाळी १०.५० ते दु.१२.५० वाजेपर्यंत अप-डाउन मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान आसनगाव ते कसारा दरम्यानची अप-डाउन मार्गावरील लोकल वाहतूक बंद असणार आहे. सीएसएमटी-कसारा स.९.४१, स.१०.१६ची लोकल आसनगाव पर्यतच धावणार आहे. कसारा-सीएसएमटी स.११.१२,दु १२.१९ च्या लोकल आसनगाव स्थानकातुन अनुक्रमे स.११.४९,दु.१२.५६ वाजता चालविण्यात येणार आहेत. रविवारी ५११५३-५४ मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर, १२११७-१८ एलटीटी-मनमाड-एलटीटी गोदावरी एक्सप्रेस रद्द केलेल्या आहेत. ११०२६ पुणे-भुसावळ एक्सप्रेस दौण्ड-मनमाड मार्गे धावणार आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@