भारतात होणार फुटबॉल वर्ल्डकप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
मियामी : भारतीय फुटबॉल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन होणार आहे. २०२० मध्ये होणाऱ्या फिफाच्या अंडर-१७ महिला फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या आयोजनाची संधी भारताला देण्यात आली आहे. २०२० च्या फुटबॉल वर्ल्डकपच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला असून शुक्रवारी फिफाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.
 

मियामी येथे झालेल्या फिफाच्या बैठकीत हा अधिकृत निर्णय घेण्यात आला. यापूर्वी फिफाच्या अंडर-१७ पुरुष फुटबॉल वर्ल्डकपचे भारताने यशस्वीरित्या आयोजन केले होते. महिलांसाठीचा फुटबॉल वर्ल्डकप भारतात होणार असल्याने भारतीय महिला फुटबॉल संघाला चांगली संधी आहे. गेल्या वर्षी स्पेनचा महिला फुटबॉल संघ अंडर-१७ फुटबॉल वर्ल्डकपमध्ये विजेता ठरला होता. गेल्या वर्षी उरुग्वे येथे या फुटबॉल वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले होते. मेक्सिकोच्या महिला फुटबॉल संघाचा पराभव करून स्पेनचा महिला फुटबॉल संघ विजेता ठरला होता. न्यूझीलंड आणि कॅनडाचा महिला फुटबॉल संघ गेल्या वर्षीच्या वर्ल्डकपमध्ये अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@