काश्मीरमधील दहशतवाद सर्वसमावेशक उपाय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2019   
Total Views |

 

 
 
 
 
प्रशासनाचा दर्जा सुधारल्यावर नियंत्रणरेषेच्या दोन्ही बाजूंकडील लोकांना परस्परांस भेटू द्यावे. भारताच्या इतर नागरिकांशी संबध वाढवण्यासाठी पर्यटन वाढवावे. काश्मिरींना त्यांच्या स्वत:च्या पायांवर उभे राहण्यास मदत करावी. जीवनाचा दर्जा उंचावण्याकरिता प्रौढ साक्षरता मोहीम सुरू करावी. विशेषत: शेती, उद्यानविद्या, पर्यटन आणि आरोग्यशिक्षण याबाबत दूरदर्शनसारखी माध्यमे वापरून घ्यावीत. अतिरेक्यांच्या निरनिराळ्या चेहऱ्यांशी लढा देण्याकरिता लोकसंख्येच्या एकतर्फी स्थलांतरास विरोध करावा.
 

प्रत्येक भारतीयाला दहशतवादविरोधी युद्धात सहभागी झाले पाहिजे. आपल्या भूमीतून आपण या दुष्प्रवृत्तीचा नायनाट केला पाहिजे. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद हाताळण्याकरिता एक सर्वसमावेशक योजना तयार करणे जरुरी आहे. ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. आपल्याला विजयी व्हायचे असेल, तर या प्रक्रियेदरम्यान काही मुख्य मुद्दे विसरता कामा नये. आपल्या दहशतवादविरोधी कार्यवाहीचा केंद्रबिंदू (सर्वात महत्त्वाचा घटक) काश्मिरातील लोकच आहेत. पाकिस्तानच्या छुप्या युद्धाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन जरुरी आहे.

 

देशाच्या सर्व घटकांचा वापर

 

या घटकांत आर्थिक ताकद, तंत्रज्ञान, सैन्य दले, स्थिर सरकार/ परिपक्व लोकशाही इत्यादींचा समावेश होतो. इतर घटकांत राष्ट्रीय इच्छाशक्ती, ऐक्य आणि नीतिधैर्य यांचा समावेश होतो. जम्मू आणि काश्मीरमधील छुप्या युद्धाचा सामना करण्यासाठी सैन्य दले आणि उत्तमरीत्या सुघटित व कार्यक्षम असलेली निमलष्करी दले आणि केंद्रीय-पोलीस-दले यांचे इतर घटकांसोबत ऐक्य साधले गेले पाहिजे. अशा प्रकारचा एकीकृत मार्ग सर्वोच्च राष्ट्रीय पातळीवरून राज्य पातळी व जिल्हा पातळीवर उतरत जायला हवा. आर्थिक-सामर्थ्य युद्ध (इकॉनॉमिक वॉरफेअर), माहिती युद्ध (इन्फॉर्मेशन वॉरफेअर), विजकीय युद्ध (इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर), नौदल, गुप्तचरदल इत्यादींचा पाकिस्तानच्या छुप्या युद्धाचा सामना करण्यासाठी वापर केला जावा२६ जानेवारीच्या संचालनामध्ये दिल्लीला दाखवण्यात येणार्‍या सगळ्या शस्त्रांचा जर आपल्याला वापर करता येत नसेल, तर त्यांचा काय उपयोग? शस्त्रे ही शत्रूंच्या विरुद्ध वापरण्याकरिता असतात. केवळ देखावाकरत नसतात?

 

पाकिस्तानविरुद्ध माहिती ‘युद्ध जिंका’

 

आपण काश्मीर व पाकिस्तानातील बाजार, हिंदी चित्रपट आणि गीते यांनी भरून टाकू शकू काय? भारत काश्मीर आणि पाकिस्तानात आपल्या मनोरंजन वाहिन्यांचे प्रक्षेपण करू शकू काय? बलुचिस्तान, एफएटीएमधील मानवी-हक्क-भंगांबाबतची आपली चिंता व्यक्त करू शकू काय? पाकिस्तानातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवरील मानवी हक्कभंगांची प्रकरणे समोर आणू शकू काय? पाकिस्तानातील शिया आणि सुन्नी यांच्यातील भेद आणि शियांवर होणारा अन्याय आपण अधोरेखित करू शकू काय? पाकिस्तान आपल्या देशात अमली पदार्थांचे व्यसन रुजवत आहे, ‘नारको टेररिझम’ म्हणजे अफू-गांजा-चरसचे युद्ध चालवत आहे, याविषयी आपण जगाला माहिती देऊ शकतो का? आणि पाकिस्तानला वाळीत टाकण्याकरिता प्रयत्न करू शकतो का? पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयविरुद्ध आपण माहितीयुद्ध छेडू शकू काय? ज्यामुळे त्यांची दुष्कृत्ये बाहेर येऊन जनमत त्यांच्या विरुद्ध जाईल? पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तान व पाकिस्तानात केलेला शस्त्रांचा वापर समोर येईल. पाकिस्तानातील अंतर्गत कलहावर पुस्तके प्रकाशित करू शकू काय? मात्र, आपली माध्यमे मात्र आपल्या राजकीय पक्षात भांडणे लावण्यात गुंतली आहेत. आपल्याला हे लक्षात येत नाही की, आपण आपली सगळी ताकद पाकिस्तान दहशतवाद आणि चीन यासारख्या शत्रूंच्या विरुद्ध वापरली पाहिजे. देशातल्या सगळ्या घटकांनी एकत्र येऊन दहशतवादी विरोधी लढ्यांमध्ये भाग घ्यायला पाहिजे.

 

इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’चा वापर

 

पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील माहितीसंचार रोखणे, बाहेरून रेडिओ बलुचिस्तान सुरू करणे, पाकिस्तानी सैन्याच्या आंतरजालाच्या, प्रक्षेपणास्त्रांच्या आणि आण्विक-मार्गदर्शक-प्रणालीच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर संकेतांची उकल करणे, प्रत्येक शत्रुत्वपूर्ण कार्यवाहीचे प्रत्युत्तर देणे, मात्र त्यातील खेळी बुद्धिबळातील खेळींप्रमाणे खेळाव्यात. पाकिस्तानच्या प्रतिसादांसाठी आपण तयार राहावे आणि पाकिस्तान व आयएसआयकरिता अशा खेळींचे मोल वाढवत न्यावे. पाकिस्तानात छुपे युद्ध नेण्याकरिता भरपूरच पर्याय उपलब्ध आहेतआपण स्वत:ला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची महासत्ता समजतो. मग आपल्याला पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये घुसून त्या उद्ध्वस्त करता येणार नाही का? त्यांची माहिती आपण थांबू शकतो का? त्यांच्यावर त्यांच्या प्रणालीत घुसून आपण लक्ष ठेवू शकतो का? थोडक्यात, त्यांच्या विरुद्ध एक सर्वसमावेशक सायबर युद्ध सुरू करण्याची गरज आहे. अर्थातच, पाकिस्तान याला प्रत्युत्तर देईल. त्याकरिता अर्थातच आपल्याला तयार राहावे लागेल. हिंसाचार आणि स्फोटक-उपाय हे अंतिम पर्याय असावेत.

 

छुप्या युद्धाविरोधी प्रतिहल्ला

 

पाकिस्तानला त्याच्या स्वत:च्याच औषधाची चव चाखवली गेली पाहिजे. पाकिस्तानची सिंध, बलुचिस्तान आणि एनडब्ल्यूएफपी ही राज्ये गोंधळाच्या परिस्थितीत आहेत. तिथे फुटीर चळवळी अस्तित्वात आहेत. या प्रांतांत तर पैशाने काहीही विकत घेता येऊ शकते, अशी अवस्था आहे. अमेरिकेनेही अफगाणिस्तानातील लष्करी कार्यवाहीदरम्यान भरपूर पैसा वापरला होता. भारतही छुपे युद्ध, बलुचिस्तान आणि एनडब्ल्यूएफपी या पाकिस्तानी प्रांतांत नेण्याकरिता सर्व उपाय वापरू शकतो. एकदा का पाकिस्तानी सैन्य छुप्या युद्धात गुंतले आणि तालिबानी कारवायांत एनडब्ल्यूएफपीमध्ये गमावत आहेत तसे सैनिकांचे प्राण गमवू लागले की, त्यांना जम्मू आणि काश्मिरातील छुप्या युद्धाची पूर्वतयारी करणार्या दहशतवाद्यांना आधार देणे थांबवावे लागेल. आपल्याकडून अर्थपूर्ण आणि प्रभावी प्रतिसाद मिळत नसल्याने, दहशतवाद्यांच्या हस्ते भारताचेच रक्त वाहत आहे आणि पाकिस्तानी सैन्य नामानिराळे राहत आहे. जिथपर्यंत पाकिस्तानी भूदलास, छुपे युद्ध दोघेही खेळू शकतात आणि भारत ते अधिक प्रभावीपणे आणि निर्णायक रीतीने खेळू शकतो, या वास्तवाचे भान आणून दिले जात नाही, तोपर्यंत या सत्यानाशी युद्धापासून सुटका होणार नाही. पाकिस्तानने भारतास आणि भारतीय सैन्यास, अफगाणिस्तानमध्ये/ नेपाळमध्ये/बांगलादेशात आणि अगदी सोमालियातही लक्ष्य केलेले आहे. आपण पण त्यांचा सामना या सर्वच देशात करू शकू काय? याकरिता पुढील काही उपाय अंमलात आणले जाऊ शकतात. सिंध, पाकव्याप्त काश्मीर, एनडब्ल्यूएफपी या प्रदेशांत गंभीर हल्ले चढवून त्यात सहभाग असल्याचे नाकारत राहणे. पाकिस्तानातील फुटीरवादात तेल ओतणे. शेजारी देशांतील आयएसआयच्या कारवायांना आपल्या हस्तकांकरवी आणि या देशांत घातलेल्या गुप्त छाप्यांद्वारे पायबंद घालणे. पाकिस्तानातील आयएसआयला लक्ष्य करण्यासाठी इराण आणि अफगानिस्तानची मदत घेणे. आयएसआयला लक्ष्य करण्यासाठी सीआयए मोसाद यासारख्या मित्रपक्षी गुप्तवार्ता संकलन संस्थांचा वापर करणे.

 

काही इतर उपाय : खालील काही उपायही केले जाऊ शकतील.

 

राज्याबाहेरील विद्वान संपादकासहित काश्मिरी वृत्तपत्रे चालवावीत. ज्यामुळे अपप्रचार बंद होईल. जम्मू आणि काश्मीर व उर्वरित देश यातील विलगता दूर करण्याकरिता दळणवळणाची प्रणाली सुधारावी. (जम्मू-श्रीनगर रेल्वे मार्ग सर्वात महत्त्वाचा!) भारतीयत्वाचा पक्ष घेण्याकरिता नवीन पिढीस लक्ष्य करावे. प्रशासनाचा दर्जा सुधारल्यावर नियंत्रणरेषेच्या दोन्ही बाजूंकडील लोकांना परस्परांस भेटू द्यावे. भारताच्या इतर नागरिकांशी संबंध वाढवण्यासाठी पर्यटन वाढवावे. तुष्टीकरण थांबवावे. काश्मिरींना त्यांच्या स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास मदत करावी. जीवनाचा दर्जा उंचावण्याकरिता प्रौढ साक्षरता मोहीम सुरू करावी. विशेषत: शेती, उद्यानविद्या, पर्यटन आणि आरोग्यशिक्षण याबाबत दूरदर्शनसारखी माध्यमे वापरून घ्यावीत. अतिरेक्यांच्या निरनिराळ्या चेहऱ्यांशी लढा देण्याकरिता लोकसंख्येच्या एकतर्फी स्थलांतरास विरोध करावा. हे हेतुपुरस्सर करण्याची आवश्यकता आहे. प्रति-पाकिस्तानी, प्रति-अतिरेकी भावना जम्मू-आणि-काश्मीरमध्ये प्रोत्साहित आणि प्रेरित करावी. इतर भारतीयांसोबत धार्मिक संबंधांना प्रोत्साहन द्यावे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@