मोदींविषयीच्या ‘त्या’ ट्विटबाबत आर.माधवन काँग्रेसवर भडकला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : लोकसभा निवडणकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे देशभरात सगळीकडे निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजपच्या विरोधात काँग्रेसने यापूर्वी अनेक डावपेच रचले. परंतु त्याला यश आले नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान मोदींविषयी एक टीका करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओवर आक्षेप घेत अभिनेता आर. माधवनने काँग्रेसला खडेबोल सुनावले.
 

काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून १४ मार्च रोजी सकाळी ९ वाजून १२ मिनिटांनी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील संवाद एडिट करून ट्विट करण्यात आला. या व्हिडिओद्वारे पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवण्यात आली. #Hugplomacyyaadrakhana हा हॅशटॅग वापरण्यात आला. काँग्रेसचे हे ट्विट खूप व्हायरल झाले होते. अभिनेता आर. माधवनने या व्हिडिओवर आक्षेप घेत काँग्रेसला चांगलेच सुनावले.

 
 
 

हे अत्यंत वाईट आहे. राजकीय स्पर्धा काहीही असो. परंतु मोदीजी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. या व्हिडिओद्वारे चीनसमोर भारताचा अपमान केल्यासारखे आहे. अशाप्रकारच्या व्हिडिओमुळे विनोद निर्मिती करण्याचा मुर्ख प्रयत्न करण्यात आला आहे. या ट्विटर हँडल करून हे अपेक्षित नव्हतेअसे आर. माधवनने ट्विट केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@