छशिमट पुल अपघात : पुलाचा सांगाडा पाडला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2019
Total Views |



मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाचा सांगाडा शुक्रवारी रात्री जमिनदोस्त करण्यात आला. या भागातून जाणारा सीएसएमटी लगतचा डी.एन.रोड वाहतूकीस बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेला जबाबदार महापालिकेतील अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून यात दोन निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हे आदेश दिले आहेत.

पालिकेतील दक्षता विभागातील मुख्य कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील, साहाय्यक अभियंता एस. एफ. काकुळते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निवृत्त मुख्य अभियंता (पूल व्यवस्था) एस. ओ. कोरी आणि निवृत्त उप मुख्य अभियंता आर. बी. तरे यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आर.पी.एस. या कंत्राटदारावर पुलाच्या देखरेखीची जबाबदारी होती, त्यालाही कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

 



या घटनेशी आणि कारवाईशी संबंधित सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे. महापालिका आयुक्त्यांच्या आदेशानंतर आजी-माजी अधिकाऱ्यांना खातेनिहाय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची माहिती दिली आहे. महापालिका आयुक्त्यांच्या आदेशानंतर आजी-माजी अधिकाऱ्यांना खातेनिहाय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची माहिती दिली आहे.
 



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


@@AUTHORINFO_V1@@