नातवाच्या हट्टापुढे अखेर आजोबा नमले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2019
Total Views |


 

 

पार्थ पवारांना मावळमधून राष्ट्रवादीची उमेदवारी

 

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू व अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांना अखेर राष्ट्रवादीने मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये मावळ, शिरूर, बीड, नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

 

पार्थ पवार यांना मावळ येथून लढण्याबाबतचा तिढा गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत होता. पार्थ यांना उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला होता. यामुळे शरद पवार यांना नमतं घ्यावं लागलं असून अखेर पार्थ यांची उमेदवारी जाहीर करावी लागली. दरम्यान, घरातून तीन उमेदवार नको म्हणून स्वतः पवारांना माघार घ्यावी लागली होती.

 

मावळच्या उमेदवारीचा प्रश्न मिटला असला तरी अहमदनगर व माढाच्या उमेदवारीचा संभ्रम कायम आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर धनराज महाले यांना दिंडोरी येथून, पंकज भुजबळ यांना नाशिक येथून तर बीड येथून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@