जबाबदारी निश्चिती व्हायला हवी : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2019
Total Views |


 


मुंबई : "स्ट्रक्चरल ऑडिट होऊनसुद्धा असा अपघात होणे, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या अपघाताची जबाबदारी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत घ्यायला हवी." असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते सेंट जॉर्ज रुग्णालयात अपघातग्रस्तांचा भेट घेतल्यांनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गुरुवारी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा भाग कोसळून ३ महिलांसह ६ जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले.

 
 

शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. "ज्या पुलांची ऑडिट झाले आहेत, त्यांची पुन्हा एकदा तपासणी व्हावी. तसेच, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जबाबदारी कोणाची हे निश्चित करा. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करणार." असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

 

मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

 

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. शिवाय, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकारकडून करण्यात येणार आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@