सीएसएमटी स्टेशनजवळील पादचारी पूल कोसळला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : सीएसएमटी स्टेशनजवळील पादचारी पुलाचा काही भाग गुरुवारी संध्याकाळी कोसळला. दररोज या पूलावरून हजारो लोकांची ये-जा असते. अनेकजण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. संध्याकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना घडली. जखमींना सीएसएमटी स्टेशनजवळील सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ३२ जण जखमी झाले आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या पादचारी पुलाचा ६० टक्के भाग कोसळला असून उर्वरित पूल पाडण्याचे काम सुरु आहे. सीएसटीच्या दिशेने जाणारी रस्ते वाहतूक वळविण्यात आली आहे. या दुर्घटनेतील जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
दरम्यान,  केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ट्विट केले.  त्या ट्विटमध्ये ते म्हणाले की,  "या दुर्घटनेत अपघातग्रस्तांच्या कुटंबियांच्या दु:खात आम्ही सामील आहोत. रेल्वेचे डॉक्टर, कर्मचारी  आणि महानगरपालिकेचे कर्मचारी मिळून या बचावकार्यास सहकार्य करत आहेत." 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@