मोदींच्या ट्विटला बॉलिवुड कलाकारांचे उत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक बॉलिवुड कलाकारांना आपल्या ट्विटमध्ये टॅग केले होते. कलाकारांनी लोकांना मतदानाचे महत्त्व सांगावे आणि मतदानाचा हक्क बजावण्यास प्रोत्साहन द्यावे अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले होते. पंतप्रधान मोदींच्या या ट्विटला बॉलिवुड कलाकारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करू. अशा प्रतिक्रिया कलाकारांनी दिल्या आहेत.
 

थोडा जोर लावा आणि मतदानाला एक सुपरहिट कथा बनवा.असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी बॉलिवुड कलाकारांना टॅग केले होते. अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींच्या या ट्विटला आपल्या हटके स्टाईलने उत्तर दिले. मतदानाच्या प्रक्रियेला देश आणि देशातील नागरिक यांमधील एक सुपरहिट प्रेमकथा व्हावेच लागेल. हे एका उत्तम लोकशाहीचे प्रतिक आहे. असे अक्षय कुमारने म्हटले.

 
 
 
 
 
“नक्कीच आम्ही या मोहिमेत सहभागी होऊ.” असे संगीतकार ए.आर रहमान यांनी ट्विट करून सकारात्मक प्रतिसाद दिला.
 
 
 
 
 
“एकदम बरोबर सर, चला भारताचे नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडूयात.” असे आमीर खानने म्हटले.
 
 
 
 
 
आम्ही मतदानाबाबत जागरुकता करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असे बॉलिवुड दिग्दर्शक करण जोहरने ट्विट केले.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@