“चीनी वस्तूंचा वापर बंद करा” - #BoycottChineseProducts

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2019
Total Views |



नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार पाकच्या जैश-ए-मोहम्मदया संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकार दर्शवला आहे. गेल्या दहा वर्षातील हा चौथा प्रस्ताव चीनने अमान्य केला आहे.


 

चीनच्या या निर्णयामुळे भारतीय नेटीझन्स चांगलेच संतापले आहेत. मसूदला पाठिंबा देणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी चीनी वस्तूंचा वापर बंद करा, असे मत अनेकांनी ट्विटवर मांडले आहे. #BoycottChina आणि #BoycottChineseProducts हे हॅशटॅग सध्या ट्विटवर ट्रेण्ड होताना दिसत असून चीनी वस्तूंवर बंदी घाला, अशी मागणी केली जात आहे.


 

चीनकडून पाकिस्तानला पाठीशी घालण्याच्या प्रकाराविरोधात आता अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि रूस आदी देशांनीही चीनला सुनावले आहे. चीनला इशारा देत त्यांनी हे धोरण न बदलल्यास अन्य कारवाईचा विचार करणार असल्याचेही म्हटले आहे.


 

अमेरिकेनेही .या प्रकरणी आम्ही प्रयत्न सुरूच ठेवणार असून दहशतवादाविरोधात आता शांत बसणार नसल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रात दिला आहे. चीनने अशी नीती कायम ठेवल्यास आम्हाला अन्य मार्गांचाही विचार करावा लागेल, असा इशारा चीनला देण्यात आला आहे.


 

मसूद अजहर आणि ४३ लाख कोटींची डील

चीनने संयुक्त राष्ट्रात मसूद अजहर विरोधात प्रस्तावाला पाठींबा दिल्यास मसूद चीन-पाकिस्तान कॉरिडोरला (CPEC) टार्गेट करेल, अशी भीती चीनला आहे. आधीच व्यापार युद्धात नुकसान सहन करावे लागत असणाऱ्या चीनला पाकिस्तानकडून होणारा व्यापार गमवायचा नसल्याने चीन पाकिस्तानला कायम पाठीशी घालत आहे. एकूण १० हजार चीनी कर्मचारी या CPEC वर काम करत आहेत. CPEC हे पाकिस्तानने अवैध कब्जा केलेल्या काश्मीर, गिलगीट-बलीस्तानहून बालाकोट येथून जातो. या ठिकाणी पाकिस्तानने भारतीय भूभागाचा मोठ्या प्रमाणावर कब्जा केला आहे.


 

भारतीयांमध्ये संताप चीनी वस्तूंवर बहिष्कार

भारतीयांकडून पुन्हा चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहिम पुन्हा सुरू केली जाऊ शकते. होळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर चीनी वस्तूंची खरेदी केली जाते. केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही मोहीम केवळ भारतीय नेटीझन्स सुरू करण्याची मागणी करत आहेत.



 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat













@@AUTHORINFO_V1@@