राजेश मोरेंच्या सत्कार्यामुळे हरवलेली पर्स मिळाली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
कॉटनग्रीन : एखादी मौल्यवान वस्तू गहाळ झाली आपण ती कुठे विसरलो की ती परत मिळविणे खूपच कठीण असते. हरवलेली मौल्यवान वस्तू आपल्याला परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. पण ही शक्यता ज्यांच्याबाबतीत खरी ठरते त्या व्यक्ती नशीबवान ठरतात. अशीच एक घटना कॉटनग्रीन स्टेशनवर घडली.
 

रविवारी रितू यादव नामक एक तरुणी तिला स्टेशनवर सापडलेली एक पर्स घेऊन कॉटनग्रीन स्टेशनचे बुकिंग क्लर्क राजेश मोरे यांच्याकडे घेऊन आली. ती पर्स रितूने योग्य व्यक्तीस देण्यास सांगितले. राजेश मोरे यांनी पर्स उघडून पाहिली असता त्यात ४५०० रोख रक्कम आणि एक मंगळसूत्र होते. पर्समध्ये पॅनकार्डही होते. परंतु त्यावर फोन क्रमांक नसल्याने पर्सच्या मालकीणीला संपर्क करता येत नव्हता. पर्समध्ये ज्वेलर्सची एक पावती होती. ज्वेलर्सला संपर्क करून पॅनकार्डवरील महिलेचे नाव त्याला राजेश मोरे यांनी सांगितले. अनिता तेहर असे या महिलेचे नाव आहे.

 

अनिता यांना कॉटनग्रीन स्टेशन ऑफिसमध्ये बोलावण्यात आले. पर्सची ओळख पटवून अनिता यांच्याकडे ती पर्स सुपुर्द करण्यात आली. ४५०० रुपयांची रोख रक्कम आणि मंगळसूत्र अनिता यांना परत करण्यात आले. यावेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल कॉटनग्रीन स्टेशन कार्यालयात उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थित ती पर्स अनिता तेहर यांना परत करण्यात आली. राजेश मोरे यांनी केलेल्या या सत्कार्याबद्दल त्यांचे स्टेशन कार्यालयात कौतुक केले जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@