आपे एक्स्ट्रॉ श्रेणीसाठी पियाजिओचे ‘मायलेज का राजा’ अभियान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2019
Total Views |


 

 

मुंबई : पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि. (पीव्हीपीएल) कंपनीने आपल्या आपे एक्स्ट्रा या श्रेणीतील उत्पादनांसाठी मायलेज का राजाहे अभियान सुरू केले आहे. पीव्हीपीएल ही इटलीच्या पियाजिओ ग्रुपची १०० टक्के उपकंपनी असून भारतातील लहान कमर्शियल गाड्यांच्या क्षेत्रातील आघाडीची उत्पादक आहे. आपे एक्स्ट्रा श्रेणीमध्ये आपे एक्स्ट्रा एलडीएक्स, आपे एक्स्ट्रा एलडीएक्स प्लस आणि आपे एक्स्ट्रा डीएक्स या वाहनांचा समावेश होतो.

 

मायलेज का राजाहे अभियानाद्वारे पियाजिओने आपे एक्स्ट्रॉ श्रेणीतील उत्पादनांसाठी विविध सुविधा सादर केल्या आहेत. ज्यामध्ये १५ हजार एक्स्चेंज बोनस / विमा शुल्क, काही विशेष अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून ९५ टक्के अर्थ पुरवठा या उद्योगातील पहिलावहिला सुपर वॉरंटी प्रोग्रॅम यांचा समावेश आहे. उद्योगातील पहिल्यावहिल्या सुपर वॉरंटी प्रोग्रॅमअंतर्गत जे ग्राहक आपे एक्स्ट्रॉ डिझेल गाडी विकत घेतली त्यांना ४२ महिन्यांची वॉरंटी मिळेल. एक्स्ट्रॉ मायलेज स्पर्धेचा विचार करता आपे एक्स्ट्रा श्रेणीतील उत्पादन घेतल्यास उत्तम मायलेजमुळे ग्राहकाचे ३० हजार रुपये वाचणार आहेत.

 

 
 

ग्राहकांसाठी वाहनांची मोफत तपासणी त्याचबरोबर प्रत्यक्ष ग्राहक भेटींसारखे अनेक उपक्रम या अभियानअंतर्गत राबवले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ५०००० हुन अधिक ग्राहक, वित्त पुरवठा करणारे प्रतिनिधी अणि कंपनीचे विविध सहयोगी देशभरातील ४०० डीलर 'माइलेज का राजा' अभियानासाठी उपस्थित होते. या अभियानाच्या पहिल्याच दिवशी ७०० हुन अधिक वाहनांची ग्रहकांना डिलीवरी देण्यात आली. यावेळी पियाजिओ व्हेइकल्स प्रा. लि.च्या मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मलिंद कपूर म्हणाले, ''आमच्या ग्राहकांना त्या श्रेणीतील सर्वोत्तम सुविधा देणे याला आम्ही नेहमीच महत्त्व देतो. मायलेज का राजाया अभियानामुळे लहान कमर्शियल वाहनांच्या उद्योगात पियाजिओचे अस्तित्व वाढेल आणि अधिक दृढ होईल. तीनचाकी कार्गो गाड्यांच्या विस्तृत श्रेणीमध्ये आपे एक्स्ट्रा एलडीएक्सची ६ फूट सीएनजी आणि एलपीजी या मॉडेलचा समावेश होतो. हे वाहन उद्योगातील अधिक वजन उचलू शकणारे पहिले वाहन आहे. त्याचबरोबर त्याचे मायलेजही उत्तम आहे. त्यामुळे ग्राहकाला जास्त कमाईची संधी मिळणार आहे.''

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@