‘ऑनलाईन मिस्टेक’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : मनात निर्धार केला तर जिद्दीच्या जोरावर आदिवासी आपल्या आयुष्यात काय करुन दाखवू शकतात, याचे दर्शन घडवणारा ऑनलाईन मिस्टेकहा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमाचे चित्रीकरण सध्या यवतमाळमधील पुसद, उमरखेड आणि कृष्णापूर या तीन गावात सुरु आहे. आस्क मोशन फिल्म्स प्रस्तुत या सिनेमाचे निर्माते अरुण किनवटकर यांनी केली आहे. निर्माता म्हणून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. अरुण किनवटकर हे स्वत: आदिवासी कुटुंबातील आहेत. डॉ. राज माने आणि विनोद संतोषराव डवरे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहेत. प्रज्ञा चौगुले गुरुंग यांनी सिनेमाचे संवादलेखन केले असून सिनेमात आदिवासी महिलेची महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
 

अनेक वर्षे समाजातील दुर्लक्षित घटक राहिल्यामुळे आदिवासींना नक्षलवादी बनविण्यासाठी कसे लक्ष्य केले जाते. या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ऑनलाईन मिस्टेक या सिनेमातून करण्यात आला आहे. अशी माहिती निर्माते अरुण किनवटकर यांनी सिनेमाविषयी बोलताना दिली. या सिनेमातून आदिवासी आणि राजघराण्यातील सुंदर अशी प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. शिवाय सिनेमातून आदिवासी समाजाची संस्कृती देखील दाखवण्यात आली आहे. गाव आणि शहर या दोघांचा समन्वय सिनेमात दाखवण्यात आला आहे. निर्माता म्हणून हा माझा पहिलाच सिनेमा असल्याने अनेक गोष्टींचा सामना मला करावा लागत असला तरी गावात येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याने मी आनंदी आहे.” असे अरुण किनवटकर यांनी म्हटले.

 

दिग्दर्शक डॉ. राज माने आणि विनोद डवरे यांनी सांगितले की, ‘ऑनलाईन मिस्टेकया सिनेमाची कथा आदिवासी कुटुंब आणि पाटील कुटुंब यांच्यातील नाते संबधांवर आधारित आहे. सिनेमात अनेक उप- कथानक आहेत. एक वेगळी प्रेमकथा दाखविण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे, आदिवासी तरुणांना नक्षवाद्याच्या वाटेवरून चांगल्या मार्गावर कसे आणता येईल हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या गावातील अनेक स्थानिक कलाकरांना आम्ही मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांसोबत काम करण्याची संधी दिली आहे. ऑनलाईन मिस्टेक या सिनेमात एकू चार गाणी आहेत. सिनेमाचे संगीत दिनेश अर्जुन यांनी दिले आहे. 

 

अनेक हिंदी आणि मराठी सिनेमातून हमखास दिसणारा चेहरा म्हणजे गणेश यादव. ते म्हणाले की, आजवर प्रेक्षकांनी मला खलनायकाच्या भूमिकेत पाहिले आहे, परंतु या सिनेमात मी दादासाहेब देशमुखांची भूमिका साकारत आहे, अतिशय प्रेमळ अशी ही व्यक्तिरेखा आहे, दादासाहेबांनी आजवर अनेक आदिवासी कुटुंबीयांसाठी मदत केली आहे, इतकेच नव्हे तर ते एका आदिवासी नक्षलवादी व्यक्तीच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचा सांभाळ करतात. त्यांच्यात सुधारणा व्हावी यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.

 

अभिनेते प्रल्हाद चव्हाण या सिनेमात माधवराव देशमुखांची भूमिका साकारत आहेत. ते भूमिकेविषयी सांगतात की, “अतिशय मनमौजी अशी ही भूमिका आहे. आजवर मी अशी भूमिका साकारलेली नाही. विशाल पाटील हा सिनेमाचा नायक आहे, माधवरावांचा मुलगा मोहितची भूमिका विशाल साकारत आहे. अभिनेत्री अदिती कामले या सिनेमाची नायिका आहे. ती सुबी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तसेच शीतल गीते, अॅड. प्रिती मोरे, अस्मिता खटकटे, दिनकर गावंडे, अजित बिरवटकर, तुषार खेडेकर, ज्योती निसळ, रोहन पेडणेकर, साया काशिद, नयन पवार या कलाकारांच्या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाचे प्रसिद्धी प्रमुख भूपेंद्रकुमार नंदन आहेत. नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित यांनी केले असून, रवि चंदन हे कॅमेरामन आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@